जळगावात रानडुकराचा धुमाकूळ

By admin | Published: June 9, 2017 04:39 PM2017-06-09T16:39:58+5:302017-06-09T16:39:58+5:30

केकतनिंभोरा येथील विद्यार्थी जखमी. महिला व मुलांमध्ये भीती

Rosewolf in Jalgaon | जळगावात रानडुकराचा धुमाकूळ

जळगावात रानडुकराचा धुमाकूळ

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.9 - ग्रामीण भागात शेत शिवारात आढळणा:या रानडुकराने शुक्रवारी शहरातील विद्युत कॉलनीत सकाळी साडे अकरा वाजता धुमाकूळ घातला. यात नीलेश पाटील (रा.केकतनिंभोरा,ता.जामनेर) हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. दरम्यान, या रानडुकरामुळे परिसरात महिला व लहान मुलांमध्ये भीती निर्माण झाली.
रहिवासी भागात शिरल्याने घबराट
महामार्गाला लागून असलेल्या शासकीय अभियांत्रिकीच्या दिशेने हे रानडुकर विद्युत कॉलनीत शिरले. नागरीवस्तीत आल्याने महिलांमध्ये घबराट निर्माण झाली. अशोक जोशी यांच्या खोलीत भाडय़ाने राहत असलेला नीलेश पाटील हा विद्यार्थी बाहेरुन घरी येत असताना या रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने नीलेश बाजुला झाल्याने त्याला किरकोळ खरचटले. 
वनविभागाकडून प्रतिसाद मिळेना
नागरिक त्याच्या मागे सुटले असता हे रानडूकर गल्लीबोळातून पळत सुटले. अशोक जोशी यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वनविभागाशी काही जणांनी संपर्क साधला होता, मात्र त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. शहराला लागून असलेला सावखेडा शिवार किंवा मोहाडी रोड या परिसरातून हे रानडूकर शहरात आले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Rosewolf in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.