चोरवड सीमा तपासणी नाका हटविण्यासाठी रस्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 07:15 PM2019-12-28T19:15:41+5:302019-12-28T19:16:35+5:30

चोरवड सीमा तपाणी नाका हटविण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी कार्यकर्त्यांनी रस्तारोको आंदोलन केले.

Rostaroco agitation to remove border crossing checkpoints | चोरवड सीमा तपासणी नाका हटविण्यासाठी रस्तारोको आंदोलन

चोरवड सीमा तपासणी नाका हटविण्यासाठी रस्तारोको आंदोलन

Next
ठळक मुद्देराज्य महामार्गावर एक तास वाहतूक ठप्परुग्णवाहिकांना दिली मोकळीक

रावेर, जि.जळगाव : चोरवड सीमा तपाणी नाका हटविण्यात यावा या मागणीसाठी शनिवारी कार्यकर्त्यांनी रस्तारोको आंदोलन केले. यामुळे बºहाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर एक तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, आंदोलकांनी रुग्णवाहिकांना मात्र वाट मोकळी करून दिली.
चोरवड मध्यप्रदेश सीमा तपासणी नाक्यावरील मोटार वाहन निरीक्षक अहिरे यांनी चोरवड येथील तीन तरुणांवर दाखल केलेले दोन गुन्हे मागे घ्यावे, प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोरखधंदा चालवण्यासाठी तरूणांना हाताशी धरून त्यांच्या आयुष्याची बरबादी करत व पुन्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याने खानापूर टोल नाक्यावर उभारण्यात आलेल्या आॅनलाईन सीमा तपासणी नाक्यावर स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.
जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य राजेश वानखेडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष राजू सवर्णे, पं.स.सदस्य दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली, खरेदी विक्री संघाचे संचालक किशोर पाटील, सचिन पाटील, निळे निशाणचे कार्यकर्ते उमेश गाढे महेश तायडे, अटवाडे सरपंच गणेश महाजन, उपसरपंच कांतीलाल पाटील, निरूळ येथील माजी उपसरपंच जितेंद्र पाटील, जगन चौधरी, पाडळे बुद्रूकचे उपसरपंच फकिरा तडवी, थेरोळा येथील माजी उपसरपंच महेंद्र पाटील, माजी सरपंच गणेश चौधरी, राहुल महाजन आदींनी राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
जळगाव सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लि कंपनीचे उत्तर विभागाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र गेडाम यांच्याशी समन्वय साधून व तपासणी नाके स्थलांतरित करण्याचा त्यांना ना हरकत दाखला देवून स्थलांतरित करण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे, मोटार वाहन निरीक्षक सुनील गुरव, सचिन बुडव, खानापूर महसूल मंडळाधिकारी प्रदीप आडे उपस्थित होते. फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, फौजदार सुनील कदम, मनोज वाघमारे, उत्तम शिंदे, साहेबराव पाटील, रावेर पोलीस बळ व दंगा नियंत्रण पथक व होमगार्ड असा बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: Rostaroco agitation to remove border crossing checkpoints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.