२६ नागरिकांना घरी जावून ‘रोटरी’तर्फे वैद्यकीय सेवा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:09 PM2020-03-23T12:09:23+5:302020-03-23T12:10:05+5:30
जळगाव : जनता कर्फ्यूमध्ये आपत्कालीन स्थितीत रोटरी ईस्टच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती़ रविवारी सकाळी ...
जळगाव : जनता कर्फ्यूमध्ये आपत्कालीन स्थितीत रोटरी ईस्टच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती़ रविवारी सकाळी साडेसहा वाजेपासून २० डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती़ वीस नामांकित डॉक्टांराची टीम कार्यरत होती़ या डॉक्टरांनी शहर आणि परिसरातील २३ किमी परिसर व्यापून २६ नागरिकांच्या घरी जावून तपासणी केली़ यातील १३ नागरिकांना घरीच औषधोपचार करण्यात आले. सहा रूग्णांना रूग्णवाहिकेतून काही खासगी तर काही शासकीय रूग्णालयात हलविले़
यात रोटरी ईस्टचे अध्यक्ष डॉ़ विनोद भोईटे पाटील, सचिव विरेंद्र छाबडा यांच्यासह डॉ़ जगमोहन छाबडा, डॉ़ निलेश चांडक, डॉ़ राहुल बन्साली, डॉ. मयुरी पवार, डॉ़ अमित पवार, डॉ़ अमय कोतकर, डॉ़ मूर्तजा अमरेलीवाल, डॉ़ मंदार पंडित, डॉ़ स्वप्निल चौधरी, गौरव महाजन, श्रीधर पाटील, सचिन खडके, भावेश शहा, संजय गांधी हे कार्यरत होते़ यात जीएम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख, होनाजी चव्हाण यांनी सहकार्य केले़
-सर्व दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावर सेवा बजाविणाऱ्या अनेकांसाठी अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली होती़ तरूणांनी दुचाकीवर फिरून चौका-चौकात असलेले पोलीस तसेच गोरगरिब नागरिकांना चहा वाटप केले. ट्रस्टचे देव सचदेव, रिंकेश मकडीया, सावल अडवाणी, मुकेश मंधान, मुकेश नथाणी, अशोक मेहता, पवन मोतीरामाणी यांनी चहा वाटप केले.
-भिक मागणाऱ्यांचीही गैरसोय होवू नये, यासाठी भूषण हंसकर या तरूणाकडूनही भिक मागणाºया वृध्द तसेच बालक आणि महिलांना बिस्किटचे वाटप करण्यात आले.