रोटरी प्रिमियर क्रिकेट लिगच्या सामन्यांना सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:47+5:302021-02-05T05:50:47+5:30

फोटो : ३०सीटीआर २६ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित सागर पार्कवर रोटरी प्रिमियर ...

Rotary Premier Cricket League matches begin | रोटरी प्रिमियर क्रिकेट लिगच्या सामन्यांना सुरूवात

रोटरी प्रिमियर क्रिकेट लिगच्या सामन्यांना सुरूवात

Next

फोटो : ३०सीटीआर २६

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्ट आयोजित सागर पार्कवर रोटरी प्रिमियर लिगचे क्रिकेट सामन्यांना सुरूवात झाली आहे. स्पर्धेत वेस्ट रॉयल किंग संघाचा कर्णधार सचिन पटेलने २५ चेंडूत नाबाद १०२ धावा करत शतक झळकावले. अ‍ॅड. सुरज जहांगीर याने आरसी डार्क हॉर्सेस संघाचे तीन फलंदाज बाद करुन स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक केली.

वेस्ट एसपीसीसीने ८ विकेटने वेस्ट व्हिक्टर्स संघाला पराभूत केले. वेस्ट रॉयल किंग्सने १३२ धावा करीत आरसी डार्क हॉर्सेेसला ६९ धावांवर रोखत विजय मिळवला. ईस्ट कंमाडो संघाने चोपडा सुपर किंग्सवर ६ गड्यांनी मात केली.

स्टार्स वॉरियर्सने १८ धावांनी पाचोरा नाईट रायडर्सवर विजय मिळविला. आर.सी.डार्क हार्सेसने सेंट्रल किंग्सवर ७ विकेटने मात केली.

वेस्ट थंडर्सने पाचोरा नाईट रायडर्सला ८ गड्यांनी पराभूत केले.

सामन्यांमध्ये डॉ. विनोद पवार, रवींद्र छाजेड, डॉ. पंकज गुर्जर, अ‍ॅड. सागर चित्रे, सचिन बेहेडे, कपिल शहा, सचिन पटेल, पुनीत रावलानी, रुपेश पाटील यांना सामनावीराचा बहुमान मिळविला.

शनिवारी सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान महिलांचा क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे.

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, स्पोर्टस कमेटी चेअरमन अ‍ॅड. सुरज जहांगीर, सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे, गनी मेमन, डॉ. तुषार फिरके, वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते, मानद सचिव केकल पटेल, संगीता पाटील, डॉ.राजेश पाटील, प्रोजेक्ट चेअरमन महेश सोनी, ललीत मणियार, अतुल कोगटा उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.

स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले आहेत. पंच व गुणलेखक म्हणून मयुर सोनवणे, सुजित चव्हाणके, अभिजित पाटील तर समालोचक म्हणून ज्ञानेश्‍वर नरवडे व अयाज मोहसीन काम पाहत आहे.

Web Title: Rotary Premier Cricket League matches begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.