मायादेवी नगरात रोटरी वेस्ट तर्फे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:15 AM2021-03-24T04:15:22+5:302021-03-24T04:15:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मायादेवी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मायादेवी नगर मधील रोटरी भवन येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
या केंद्रात कोव्हॅक्सिन लस पहिला डोस देण्यात येत असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे.
रोटरी वेस्टतर्फे केंद्रात इंटरनेट सुविधेसह संगणक, प्रिंटर व ऑपरेटर आदी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रांगणात झाडा खाली मंडप, खुर्च्या व सभागृहात लाईट, पंखे, प्रतीक्षा केंद्र अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
मास्क शिवाय प्रवेश नसून सॅनिटाईझ केल्यानंतर सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात येत आहे. रोटरी वेस्टचे विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्य वेगवेगळ्या बॅच करुन स्वयंसेवक म्हणून नागरिकांना माहिती देत मार्गदर्शन करीत आहे.
नागरिकांनी या केंद्रातील विनामूल्य लसीकरणाचा फायदा घ्यावा असे रोटरी क्लब जळगाव वेस्ट तर्फे आवाहन करण्यात आले आहे.