रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध आरपीएफची मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:54 PM2020-07-23T17:54:52+5:302020-07-23T17:55:57+5:30

आठ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.

RPF intensifies crackdown on black market brokers | रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध आरपीएफची मोहीम तीव्र

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध आरपीएफची मोहीम तीव्र

Next
ठळक मुद्देभुसावळ विभागात ४४ दलालांना पकडलेआठ लाखांची तिकिटे जप्त

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांच्या काळाबाजाराचा धोका रोखण्यासाठी दलालांविरूद्ध मोहीम तीव्र केली आहे. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या छाप्यांमध्ये सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले. आठ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.
रेल्वेने १२ मेपासून १५ जोड्या वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर १ जून २ रोजी निवडक विशेष मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या १०० जोड्यांची घोषणा केली. अनेक वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढण्याची आणि या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा (बर्थ) बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या होत्या.
दलालांविरूद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषत: खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापे टाकले. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत सर्व मिळून ४४ दलालांना पकडण्यात आले आणि आठ लाख ६२ हजार १९१ किमतीची ४७९ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली.
आतापर्यंत या लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात २२ दलाल पकडले व त्यांच्याकडून सहा लाख नऊ हजार २९८ किमतीची ३२८ लाइव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरूद्ध रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त या कोविड-१९ साथीच्या काळात रेल्वेच्या सामाजिक जाणिवेच्या प्रत्येक बाबीमध्ये मध्य रेल्वे आरपीएफची टीम अग्रभागी कोरोना योद्धा म्हणून उभी राहिली आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण, रेल्वेच्या आवारात आणि प्लॅटफॉर्मवर श्रमिकांच्या प्रवेशाचे नियमन आणि लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना अन्न पॅकेटचे वितरण त्यांनी केले. लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटुंंबियांशी पुन्हा भेट घालून देण्यासाठी, श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकाऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.

Web Title: RPF intensifies crackdown on black market brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.