पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी पीसीआर आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:18+5:302021-05-09T04:17:18+5:30
भुसावल रेल्वे विभागातील ५४ कर्मचारी सेवानिवृत्त जळगाव : भुसावल रेल्वे विभागातुन ३० एप्रिल रोजी विविध विभागातील ५४ ...
भुसावल रेल्वे विभागातील ५४ कर्मचारी सेवानिवृत्त
जळगाव : भुसावल रेल्वे विभागातुन ३० एप्रिल रोजी विविध विभागातील ५४ कर्मचारी सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत्ती निमित्त रेल्वेतर्फे ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके उपस्थित होते. सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी केले.
१० हजार ग्राहकांनी पाठवले रिडिंग
जळगाव : कोरोनामुळे वीज ग्राहकांना स्वतःहून मीटर रिडिंग पाठवण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार जळगाव विभागातील १० हजार ग्राहकांनी स्वतः हुन रिडिंग पाठवले आहे. ग्राहकांना रीडिंग पाठविण्यासाठी मोबाईल अॅप, वेबसाईट व ‘एसएमएस’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी या पद्धतीने ऑनलाईन रिडिंग पाठवण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
शनीपेठेतील रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
जळगाव : शनीपेठेत अमृतच्या कामामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती न झाल्याने वाहन धारकांची मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
रेल्वे पोलिसांच्या बदल्या
जळगाव : भुसावळ रेल्वे सुरक्षा बलातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनमाड, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांच्या ठिकाणी सबंधित रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना जून पर्यंत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव रेल्वे स्टेशनवर विविध राज्यातील व भुसावळ विभागातील नवे रेल्वे पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.