आरटीजीएस व एनईएफटी शुल्कमुक्त : अर्थकारणाला चालणा मिळण्यासह वेळेची होणार बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:35 AM2019-06-07T11:35:04+5:302019-06-07T11:35:33+5:30

आता क्रेडीट कार्डवरील शुल्क कमी होण्याची अपेक्षा

RTGS and NEFT will be free of charge: With time to achieve economical time savings will be saved | आरटीजीएस व एनईएफटी शुल्कमुक्त : अर्थकारणाला चालणा मिळण्यासह वेळेची होणार बचत

आरटीजीएस व एनईएफटी शुल्कमुक्त : अर्थकारणाला चालणा मिळण्यासह वेळेची होणार बचत

Next

जळगाव : लाखो रुपये पाठविण्याचे (ट्रान्सफर) चांगले माध्यम असलेल्या आरटीजीएस आणि एनईएफटीवर वसूल करण्यात येणारे शुल्क हटविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने घेतल्याने त्याचे व्यावसायिक वर्गातून स्वागत होत आहे. यामुळे अर्थकारणाला चालणा मिळून वेळीचीदेखील बचत होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
आरटीजीएस हे (रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट) लाखो रुपये ट्रान्सफर करण्याचे चांगले माध्यम असून व्यावसायिक काही सेकंदांमध्ये रक्कम पाठवू शकतात. तसेच एनईएफटीमधून (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फण्डस् ट्रॉन्सफर) काही ठराविक काळात पैसे ट्रान्सफर केले जातात. व्यापार नगरी जळगावातून याकडे मोठा कल आहे. मात्र त्यावर शुल्क आकारले जात असल्याने त्याचा फटका पैसे पाठविण्याऱ्यास सहन करावा लागत असे. मात्र ६ जून रोजी आरबीआयने हे व्यवहार नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे व्यावसायिकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.
दर महिन्याला मोठी बचत
आरटीजीएस आणि एनईएफटीच्या प्रत्येक व्यवहारासाठी त्या व्यवहाराच्या रकमेनुसार शुल्क वसूल केले जात आहे. त्यात दर महिन्याला मोठा भूर्दंड संबंधितांना सहन करावा लागत असे. मात्र आता या निर्णयामुळे दर महिन्याला हे व्यवहार करणाऱ्यांची मोठी बचत होणार असल्याचे व्यापारी बांधवांनी सांगितले.
खºया अर्थाने ‘पेपरलेस’ व्यवहार वाढतील
आरटीजीएस आणि एनईएफटी नि:शुल्क केल्याने हे व्यवहार वाढून अर्थिक व्यवहारांना गती येण्यासह खºया अर्थाने ‘पेपरलेस’ व्यवहार वाढतील, असा विश्वासही या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.
क्रेडीट कार्डवरील शुल्क कमी करावे
आरटीजीएस आणि एनईएफटी यावरील शुल्क हटविण्याचे स्वागत आहेच, मात्र आता या सोबतच क्रेडीट कार्डसाठी लागणारे शुल्कही कमी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आरटीजीएस आणि एनईएफटी नि:शुल्क केल्याने प्रत्येक व्यावसायिकांची दर महिन्याला मोठी बचत होणार आहे. शिवाय या व्यवहारकडे अधिक कल वाढून कमी वेळेत पैसे ट्रान्सफर होण्यास मदत मिळणार आहे.
- ललित बरडिया, उपाध्यक्ष, फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (‘फॅम’)

इलेक्ट्रॉनिक व्यवहारातील फार मोठा अडसर या निर्णयामुळे दूर झाला असून यामुळे अर्थिक व्यवहारांना गती येणार आहे.
- नितीन रेदासनी, सुपर शॉप संचालक.

आरबीआयने घेतलेला निर्णय चांगला असून यामुळे सर्वांना लाभ होणार आहे. वेळेची मर्यादा वाढविण्याची अपेक्षा आहे.
- संजय रेदासनी, डाळ, धान्य व्यापारी.

या व्यवहारांवरील शुल्क हटविल्याने ते सर्वांच्या सोयीचे झाले असून त्याचा सर्वांना फायदादेखील होऊन या व्यवहारांकडे कल वाढणार आहे.
- सिद्धार्थ झवर, व्यापारी, दाणाबाजार.

व्यावयासिकांना बसणारा भूर्दंड यामुळे दूर झाला असून त्याद्वारे अधिक व्यवहार वाढतील.
- शशी बियाणी, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती.

Web Title: RTGS and NEFT will be free of charge: With time to achieve economical time savings will be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव