खासगी करणाच्या विरोधात आरटीओ कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:30+5:302021-07-08T04:12:30+5:30
जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यालय अधीक्षक चंद्रशेखर इंगळे यांच्या नेतृत्वात वरिष्ठ लिपिक ललीत मोहीते, जे. बी. कुळकर्णी, सुनीता मराठे, योगिता ...
जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यालय अधीक्षक चंद्रशेखर इंगळे यांच्या नेतृत्वात वरिष्ठ लिपिक ललीत मोहीते, जे. बी. कुळकर्णी, सुनीता मराठे, योगिता देहाडे व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना निवेदन देण्यात आले. मुंबई नवीन मोटार वाहन कायद्याच्या अनुषंगाने नव्या वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत करण्याची प्रक्रिया सुरू असून, केंद्र सरकारने मोटार वाहन विभागाच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. जनहिताच्या कोणत्याही सुधारणेस संघटनेचा विरोध नाही, मात्र सुधारणांच्या नावाखाली सुरू असलेल्या खासगीकरणाला आमचा विरोध आहे, असे स्पष्ट करत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात निदर्शने करून दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. दरम्यान, सुधारणांच्या नावाखाली खासगीकरण व कंत्राटीकरण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून, त्याला कडाडून विरोध आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.