लॉकडाऊनमुळे आरटीओचा महसूल झाला ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:35 PM2020-07-23T12:35:10+5:302020-07-23T12:35:23+5:30
तीन महिन्यात कोट्यवधीचा फटका : वार्षिक उद्दीष्टात ६ टक्के घट
सुनील पाटील ।
जळगाव : राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या विभाग म्हणून आरटीओकडे पाहिले जाते. मात्र लॉकडाऊनमुळे वाहन व आॅटोमोबाईल क्षेत्रही बंद झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका या विभागाला बसला आहे. तीन महिन्यात राज्याला एक हजार कोटीचा महसूल मिळणे अपेक्षित असताना तो फक्त शंभर कोटी रुपये मिळाला आहे. जळगाव आरटीओला मोठा फटका बसला असून वार्षिक उद्दीष्टातही ६ टक्के घट झाली आहे.
अजूनही राज्यात लॉकडाऊन असून जळगाव शहरातही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आरटीओचा कारभार व महसूल हा वाहन नोंदणी, पसंती क्रमांक, वाहन परवाना व रस्त्यावर धावणाºया वाहनांवर कारवाया यावरच अवलंबून आहे. २४ मार्च रोजी देशभरात जनता संचारबंदी लागू झाली, त्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू झाला. टप्प्याटप्प्याने हा लॉकडाऊन वाढविण्यात येत असून तो आजही कायम आहे. त्याचा परिणाम हा आरटीओच्या महसुलावर होत आहे. महसुल मिळवून देण्याच्या बाबतील जळगाव आरटीओचा क्रमांक पहिल्या दहामध्ये असतो.
गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ, मात्र उद्दीष्टात घट
२०१८-१९ या वर्षीत जळगाव आरटीओ १२३ कोटी ७१ लाखाचे उद्दीष्ट देण्यात आले होते, त्यात या विभागाने १२४ कोटीचा महसूल मिळविला होता. २०१९-२० या आर्थिक वर्षात १३१ कोटी १९ लाखाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यात १२४ कोटी ९४ लाखाचे उत्पन्न या विभागाने दिले. २०१८-१९ च्या तुलनेत महसुलात वाढ झाली असली तरी उद्दीष्टात ६ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. भरारी पथकाला ५ कोटी महसुलाचे उद्दीष्ट होते, या पथकाने १२५ टक्के काम केले. ६ कोटी ५९ लाखाचा महसूल या पथकाने मिळवून दिला.
परवाना, परमीट व फिटनेसला मुदतवाढ
लॉकडाऊन काळात जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी ज्या व्यक्तींच्या वाहन, परमीट व फिटनेस यांची १ फेब्रुवारी रोजी मुदत संपलेली आहे, अशांना ३० सप्टेबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ ला दिली. लर्निंग लायन्सस, कायमस्वरुपीचे लायसन्सधारक यांचा समोवश आहे.
फिटनेस नसलेल्या ४ हजार वाहनांवर कारवाई
आरटीओच्या पथकाने वेळोवेळी राबविलेल्या मोहिमेत योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) नसलेल्या ३ हजार ८८५ वाहनांवर तर ओव्हरलोड वाहतूक करणाºया ४३० वाहनांवर कारवाई केलेली आहे. त्याशिवाय क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाºया १ हजार १३० व अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया १ हजार ३८२ वाहनांवर कारवाई केलेली आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया ९१३ वाहनांची नोंदणी निलंबित केलेली आहे.
लॉकडाऊनमुळे वाहन उत्पादन, नोंदणी व खरेदी बंद असल्याने त्याचा परिणाम आरटीओच्या महसुलावर झालेला आहे. बाहेर रस्त्यावरील वाहनेही बंद असल्यामुळे कारवायांची मोहीम थांबली होती. त्याचा देखील परिणाम झाला आहे. या तीन महिन्यातच महसुलात मोठी घट झाली आहे. उद्दीष्टपुर्ती ६ टक्क्यानी कमी झालेली आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात वाढ झाली आहे. लॉकडाऊन असेच राहिले तर आणखी फटका बसेल.
-श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी