आरटीपीसीआर तपासण्या घटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:18 AM2021-02-09T04:18:58+5:302021-02-09T04:18:58+5:30
जळगाव : जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या अचानक कमी झाल्या असून शिक्षकांच्या तपासण्या आटोपल्यामुळे ही संख्या कमी असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येत ...
जळगाव : जिल्ह्यात आरटीपीसीआर तपासण्या अचानक कमी झाल्या असून शिक्षकांच्या तपासण्या आटोपल्यामुळे ही संख्या कमी असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. जवळपास सर्व शिक्षकांच्या टप्प्याटप्प्यात तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
आठवडाभरापूर्वी एका दिवसात ८०० तपासण्या होत असताना हीच संख्या घटून आता १६७ वर आलेली आहे. मात्र, चाचण्या वाढल्या तरी संसर्गाचे प्रमाण मात्र, स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे चाचण्यांचा कोरोना संसर्गावर परिणाम नसल्याचे सांगण्यात येत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या व संसर्गाचे प्रमाण दोनही नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यात ४७ बाधित आढळून आले असून २८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सलग पाच दिवस जिल्ह्यात कोरोनाने एकही मृत्यू नव्हता, मात्र, सोमवारी भुसावळ तालुक्यातील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.