भुसावळात आरटीपीसीआर तपासणी शिबिर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 02:01 PM2020-12-12T14:01:19+5:302020-12-12T14:03:17+5:30
ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरद्वारे शहरात व्यापक स्वरूपात आरटीपीसीआर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, त्याचा सुरुवात भुसावळ शहर पोलिस स्टेशनपासून झाली.
Next
ठळक मुद्देसोमवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासणीतपासणी अहवाल सोमवारी येणार
भ सावळ : येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटरद्वारे शहरात व्यापक स्वरूपात आरटीपीसीआर तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, त्याचा सुरुवात भुसावळ शहर पोलिस स्टेशनपासून झाली.भुसावळ पोलीस स्टेशनमधीलमधील सर्व होमगार्ड, कर्मचाऱ्यांची आणि अधिकारी वर्गांची शनिवारी तपासणी झाली असून, कोरोनाबद्दल जनजागृतीदेखील करण्यात आली. या सर्वांचे तपासणी अहवाल सोमवारी येणार आहेत. त्यानुसार पुढील उपचाराची अथवा विलगीकरण्याची कारवाई सुरू होईल.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार भुसावळ शहरात ज्यांचे जास्तीत जास्त जास्त लोकांची संपर्क येतो अशा यांची तपासणी करण्याचे नियोजन असून आमच्या पोलीस बंधूपासूनच सुरुवात झाल्यामुळे पुढील तपासणी शिबिरात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल,असा आशावाद पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी व्यक्त केला.सोमवारी बाजार पोलीस स्टेशनमधील पोलिसांची तपासणी होणार आहे. यावेळी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ..नितू पाटील, ग्रामीण रुग्णालय भुसावळ व ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर नितीन चौधरी, डॉ.विक्रांत सोनार, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, संजय पाटील, सय्यद इकबाल, संजय टाकणे, विजय पाटील, मोहन पाटील, सचिन चौधरी, अनिल चौधरी, मोहम्मद अली, विनोद गोसावी, आशा तडवी, विनोद तडवी, समाधान पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सागर सोनवणे, विद्या तायडे, एलियास शेख, निरंजना साळवे या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.‘भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्ह्यात गाजणारडॉ.मयूर नितीन चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेले हे व्यापक कोरोना तपासणी शिबिर नक्कीच कोरोना संक्रमणाचा दर कमी करण्यासाठी मदत करेल आणि हा भुसावळ पॅटर्न जळगाव जिल्ह्यात गाजणार यात शंका नाही. -डॉ.नितू पाटील, उत्तर महाराष्ट्र संयोजक, भाजप वैद्यकीय आघाडी