दाणा बाजारातील १५० व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:01+5:302020-12-11T04:42:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे शासनाचे आदेश असल्याने त्यानुसार शहरात मास टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे शासनाचे आदेश असल्याने त्यानुसार शहरात मास टेस्टिंगला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी शहरातील १५० व्यापारी, कामगार, हॉकर्स, दुकानदार यांची दाणा बाजारातील दुकानात तपासणी करण्यात आली. दोन दिवस याठिकाणी तपासणी होणार आहे.
६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के अँटीजन या प्रमाणात चाचण्या कराव्यात असे शासनाचे आदेश होते. त्यानुसार जिल्ह्यात चाचण्या वाढविण्याचे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. त्यात दुकानदार, हॉकर्स, भाजी विक्रेते आदींच्या चाचण्या करण्याचे नियोजन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील सर्वात हाय रिस्क अर्थात गर्दीच्या भागातून तपासनीला सुरवात म्हणून दाणा बाजारातून ही तपासणी सुरू झाली. यात व्यापाऱ्यांना तपासणी सोयीची व्हावी, ते तपासणीसाठी यावे, यासाठी दाणा बाजार असोसिएशनने जनता बँकेसमोरील एका दुकाना वरचा हॉल तपासणीसाठी दिला. बाजारपेठेतील अशा हाॅलमध्येच पुढील काही दिवस ही तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.
सकाळी साडे दहा वाजता तपासणीला सुरवात झाली.
यावेळी उपायुक्त संजय वाहूळे, उपायुक्त कपिल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
अँटीजन आता कमी
ज्या व्यापारी व कामगारांना अगदी तातडीची गरज आहे, त्यांचीच अँटीजन टेस्ट करण्यात येणार असून बाकी सर्वांची आता आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. ६५ टक्के आणि ३५ टक्के हे प्रमाण राखण्यासाठी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
फोटो आहे.