वरखेडी येथे आरटीपीसीआर चाचणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:14+5:302021-06-06T04:13:14+5:30
वरखेडी, ता. पाचोरा : वरखेडी ग्रामपंचायतीतर्फे केंद्रीय प्राथमिक विद्यामंदिराच्या प्रांगणात वरखेडी ग्रामस्थांसाठी आरटीपीसीआर कोरोना चाचणीचे शिबिर आयोजित करण्यात आले ...
वरखेडी, ता. पाचोरा : वरखेडी ग्रामपंचायतीतर्फे केंद्रीय प्राथमिक विद्यामंदिराच्या प्रांगणात वरखेडी ग्रामस्थांसाठी आरटीपीसीआर कोरोना चाचणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात ५० ग्रामस्थांची चाचणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर पाटील व आरोग्यसेवक राजेंद्र भिवसने यांनी ही चाचणी केली. चाचणीचा अहवाल जळगावहून दोन दिवसांनी येईल, असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. शासनातर्फे आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. गाव कोरोनामुक्त राहावे व शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले बक्षीस प्राप्त करण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेत भाग घेण्यासंदर्भात कोरोना ग्राम समितीची बैठकदेखील आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत ग्रामविकास अधिकारी गजानन नन्नवरे यांनी स्पर्धेबाबत शासनाच्या नियम व अटींची माहिती दिली. आपल्या वरखेडी गावाचा सहभाग नोंदविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासंदर्भात व स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य दोन्ही गावांचे पोलीसपाटील व कोरोना समिती सदस्य उपस्थित होते.