ओरिसा राज्यात जाणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:39+5:302021-04-11T04:15:39+5:30
सिंधी दाल पकवान दिवस साजरा करण्याचे आवाहन जळगाव : भारतीय सिंधू सभा महिला विभागातर्फे ११ एप्रिल २०२१ हा ...
सिंधी दाल पकवान दिवस साजरा करण्याचे आवाहन
जळगाव : भारतीय सिंधू सभा महिला विभागातर्फे ११ एप्रिल २०२१ हा दिवस सिंधी दाल पकवान दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी समाज बांधवांनी या दिवशी घरी दाल पकवान करून येणाऱ्या पाहुणे मंडळीलाही हा पदार्थ खायला देऊन या दिवसाचे महत्त्व वाढविण्याचे आवाहन भारतीय सिंधू सभा महिला विभाग राष्ट्रीय अध्यक्ष माया कोडनानी, राज्य अध्यक्ष रितू रासिघांनी, रेश्मा बेहरानी, विनिता भावनानी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शिवाजी नगरात जंतुनाशकाची फवारणी
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रभाग क्रमांक दोनमधील शिवाजी नगर पोलीस चौकी, संभाजी चौक, जाफर चौक, मिर्जा चौक, बोरी मशीद , अमर चौक , साळुंखे चौक या भागात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. श्री गणेश क्रीडा संस्था व नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी यासाठी सहकार्य केले. शिवाजी नगरात सर्व भागात ही फवारणी करण्यात येत असल्याचे नवनाथ दारकुंडे यांनी सांगितले.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
जळगाव : जिल्हा परिषदेकडून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, दगडगोटे वर आले आहेत. यामुळे वाहनधारकांना संथ गतीने वाहने चालवावी लागत आहेत, तरी मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात अस्वच्छता
जळगाव : जिल्हा परिषदेजवळील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात अनियमित साफसफाई करण्यात येत असल्याने अस्वच्छता पसरली आहे. यामुळे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी मनपा प्रशासनाने या उद्यानाची नियमित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.