जळगावात उन्हाळी शिबिरांना गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 02:21 PM2017-04-05T14:21:09+5:302017-04-05T14:21:09+5:30

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू असून, अजून शाळा सुरू आहेत. त्या आधीच पालकांचे आपल्या पाल्यांना या उन्हाळी सुटय़ांमध्ये उन्हाळी शिबिरांमध्ये पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे.

Rugs to summer camps in Jalgaon | जळगावात उन्हाळी शिबिरांना गर्दी

जळगावात उन्हाळी शिबिरांना गर्दी

Next

 सुटय़ांचे नियोजन : हॉर्स रायडिंग, जलतरण, स्केटिंगवर भर

जळगाव,दि.5-जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू असून, अजून शाळा सुरू आहेत. त्या आधीच पालकांचे आपल्या पाल्यांना या उन्हाळी सुटय़ांमध्ये उन्हाळी शिबिरांमध्ये पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. शहरात ठिकाठिकाणी उन्हाळी शिबिरांचे मोठ-मोठे बॅनर झळकत आहे. 
 पाल्याची आवड कोणत्या खेळात आहे. तसेच भविष्यात संबंधित खेळातील करिअर याकडेदेखील पालकवर्ग विचारपूर्वक लक्ष देत आहे. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या परीक्षा संपल्यानंतर विद्याथ्र्याना तब्बल दोन महिने सुटय़ा असतात. या काळात अभ्यासाचा त्रास विद्याथ्र्यावर नसतो. दोन महिन्यांचा सुटय़ांचा काळात विद्याथ्र्याना कौशल्य विकासाचे धडे मिळतात. 15 एप्रिलर्पयत शाळांना सुटय़ा लागणार आहे. 20 एप्रिलपासून शहरातील उन्हाळी शिबिरांना सुरुवात होणार आहे. 
या खेळांना प्राधान्य
 क्रिकेट खेळासह, स्केटींग, जिमAॅस्टिक, हॉर्स रायडींग, बॅडमिंटन खेळांवर अधिक भर दिला जात आहे.  तसेच जलतरणाकडे देखील मुलांचा कल वाढला आहे. यासह ज्युदो, कराटे, सॉप्टबॉल या खेळांनाही पालकवर्गाकडून प्राधान्य दिले जात आहे. 
कला-गुणांकडेही लक्ष
क्रीडा प्रकारासह अनेक मुला-मुलींच्या अंगी कलागुण असतात. मात्र अभ्यासाच्या ताणामुळे या कलागुणांकडे मुलांसह पालकांचे देखील दुर्लक्ष होते. उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये उन्हाळी शिबिरात दाखल करण्याखेरीज अनेक पालकांकडून आपल्या पाल्यांना नृत्य, संगीताच्या क्लासेसमध्ये पाठविले जात आहे. पाल्यांमधील वादन, गायन अशा कलांना यामुळे अधिक वाव मिळू शकेल. 

Web Title: Rugs to summer camps in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.