आतातरी राज्यकर्त्यांनी जागे व्हावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 01:06 PM2019-07-25T13:06:19+5:302019-07-25T13:06:46+5:30
सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा ...
सावित्री नदीवरील जुना जर्जर झालेला पुल पुराच्या पाण्याने तुटला होता व त्या दुर्घटनेत खूप जिवीत हानी झाली होती. तेव्हा या दुर्घटनेचा ठपका थेट सरकारवर ठेवण्याचा आतातायीपणा विरोधक किंवा माध्यमांनीही केला नव्हता. मात्र आता या युती सरकारला सत्तेत येऊन पूर्ण पाच वर्ष होत आहेत. तरी सुद्धा हे सरकार किती बेजबाबदार आहे, हे नुकत्याच झालेल्या दुर्घटनांवरून दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्यात तिवणे धरण फुटून २३ जणांचा बळी गेला. हा आकडा माध्यमांनी सांगितला आहे. नक्की कदाचित त्यापेक्षा जास्त असू शकतात. तसच पुणे, मुंबई येथे श्रीमंतांचे निवासस्थान असलेल्या गृहकुल योजनेतील कुंपणाच्या आवाढव्य भिंती गरीबांच्या झोपड्यांवर कोसळून त्यातही हकनाक बळी गेले. या व अश्या सर्व दुर्घटनांना नक्कीच सरकारची बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम ही खाती करतात तरी काय असा पडला आहे. राज्यातील युती सरकार तर सर्वच बाबतीत नापास ठरले आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा औद्योगिक विकासही ठप्प झाला आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारची अनुभवहीनता आहे. त्यामुळे आता तरी सरकारने विकास कामे सुरु करुन गोरगरीब जनतेची दुवा घ्यावी. कारण शहरातील परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येईल. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांनी ग्रामले आहेत.
-सतीश रामकृष्ण खडके, विठ्ठलपेठ, जळगाव.