बॉम्बस्फोटाची अफवा अन् उडाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:27 PM2020-01-08T17:27:24+5:302020-01-08T17:31:57+5:30

अमळनेर बसस्थानकात बॅटरीचा स्फोट

Rumors of a bomb exploded and the runaway ran | बॉम्बस्फोटाची अफवा अन् उडाली धावपळ

बॉम्बस्फोटाची अफवा अन् उडाली धावपळ

Next
ठळक मुद्देअमळनेर बसस्थानकात बॅटरीचा स्फोटइलेक्ट्रीशियनच्या डोळ्याला इजा

अमळनेर, जि.जळगाव : दुपारची १२ वाजेची वेळ... अमळनेर बसस्थानकावर प्रवाशी. विद्यार्थ्यांची गर्दी झालेली... अचानक स्फोट झाला... मोठा आवाज घुमला... सर्वत्र धावपळ सुरू झाली... प्रवाशी व विद्यार्थी बॉम्बस्फोट म्हणत पळू लागले... आगारातून एक बस घाईत निघाली अन् तिच्यापुढे एक दोन कर्मचारी पळून बाजूला व्हा म्हणत पळत होते... काही वेळात बॅटरीचा स्फोट झाला, असे कळल्यावर मात्र सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अधिक माहिती अशी की, तुषार जगन्नाथ पाटील (वय ३६, रा.बुधगाव, ता.चोपडा) हे इलेक्ट्रिशियन एसटीची बॅटरी चार्जिंग करीत होते. बॅटरी चार्ज झाली की नाही हे बघायला जाताच बॅटरीचा मोठ्या आवाजात स्फोट झाला. तुषार पाटील यांच्या डोळ्यात अ‍ॅसिड गेले. त्यांना दिसेनासे झाले. त्याच वेळी यांत्रिकी प्रमोद बाविस्कर धावत आले. शेजारच्या एम.एल.पाटील यांनी डोळ्यावर पाणी मारले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी एक एसटी बाहेर काढली. तुषार पाटील यांना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी एसटी कर्मचारी ए.ए.पाटील पळत सुटले. बसस्थानकातील गर्दी बाजूला सारण्यासाठी धावत सुटले. रस्त्याचे काम सुरू असल्याने एकतर्फी वाहतुकीमुळे कोंडी होती. सहकाऱ्याला लवकर दवाखान्यात पोहचविण्यासाठी वाहतूक मोकळी व्हावी म्हणून तेदेखील बसच्या पुढे धावत होते. डॉराहुल मुठे यांना दवाखान्यात नेल्यानंतर तुषार पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले. आगारप्रमुख अर्चना भदाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. विभागीय यंत्र अभियंता सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक उपचारासाठी तुषार पाटील यांना धुळे रवाना करण्यात आले.
अशीही अफवा
रुग्णाला एसटी बसमधून दवाखान्यात नेत असताना बसच्या पुढे एक डम्पर चालत होते. त्याला बाजूला करण्यासाठी एसटी कर्मचारी धावत असल्याने बघणाºया लोकांचा गैरसमज असा झाला की डम्परचालकाने कोणाला तरी उडवले म्हणून काहींनी मोटारसायकल काढून डम्परचा पाठलाग केला.

Web Title: Rumors of a bomb exploded and the runaway ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.