रनर्सनी रक्षाबंधनानिमित्त दिला आरोग्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:19 AM2021-08-23T04:19:01+5:302021-08-23T04:19:01+5:30

सुरुवातीला वाॅर्म अप झाले. त्यानंतर सदस्यांनी धावायला सुरुवात केली. सर्व सदस्यांनी पाच ते दहा किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. ...

Runners delivered a health message on the occasion of Rakshabandhan | रनर्सनी रक्षाबंधनानिमित्त दिला आरोग्याचा संदेश

रनर्सनी रक्षाबंधनानिमित्त दिला आरोग्याचा संदेश

Next

सुरुवातीला वाॅर्म अप झाले. त्यानंतर सदस्यांनी धावायला सुरुवात केली. सर्व सदस्यांनी पाच ते दहा किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेण्यात आली. ऑफिसर्स काॅलनीजवळ डॉ. चारुलता पाटील, डॉ. नीलिमा नेहेते, योगशिक्षिका पूनम भंगाळे यांनी प्रमोद शुक्ला, प्रवीण वारके, रणजित खरारे, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील यांना राखी बांधून विधिवत रक्षाबंधन सण साजरा केला. याप्रसंगी डॉ. संजय नेहेते यांची विशेष उपस्थिती होती.

भुसावळ रनर्सचे १०० हून अधिक महिला व पुरुष सदस्य एकत्र धावण्याचा सराव करतात. सध्या कोरोना आजाराच्या निर्बंधांमुळे प्रत्येक सदस्य एकाकी धावून सराव करीत आहे. लवकरच सर्व सदस्य एकत्र सराव करू, असा आशावाद यावेळी डॉ. नीलिमा नेहेते यांनी व्यक्त केला.

रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त आयोजित या रनबद्दल प्रवीण फालक, डॉ. तुषार पाटील, ब्रिजेश लाहोटी, सचिन अग्रवाल यांनी सर्व सदस्यांचे कौतुक केले.

Web Title: Runners delivered a health message on the occasion of Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.