धावत्या दुचाकीचे हॅँडल निघाले; दगडावर आदळून बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:51 AM2018-12-13T11:51:25+5:302018-12-13T11:52:11+5:30

ममुराबादजवळ विचित्र अपघात

Running bicycle handle ran; A child dies in a stone | धावत्या दुचाकीचे हॅँडल निघाले; दगडावर आदळून बालक ठार

धावत्या दुचाकीचे हॅँडल निघाले; दगडावर आदळून बालक ठार

Next
ठळक मुद्देचिंचोलीचे पती-पत्नी जखमीसुरक्षा रक्षक व फार्मासिस्ट नसल्याने वादाच्या घटना

जळगाव : धावत्या दुचाकीचे हॅँडल व शॉकअप निघाल्याने वडीलांच्या पुढे बसलेल्या पाच वर्षाचा बालक दगडावर आदळल्याने डोक्याला मार लागून जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ममुराबाद गावापासून काही अंतरावर घडली. यज्ञेश जगन धनगर (वय ५) असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याचे वडील राजू जगन धनगर व आई माधुरी (मुळ रा.चिंचोली, ता.यावल, ह.मु.रायपुर, ता.जळगाव) असे जखमींची नावे आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजू धनगर हा तरुण रायपुर येथे वास्तव्याला असून महामार्गावर त्याचे कालिंका माता चौक परिसरात वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. बुधवारी पत्नी माधुरी व मुलगा यज्ञेश याच्यासह मुळ गावी चिंचोली येथे दुचाकीने जात असताना ममुराबाद गावापासून पुढे
धामणगाव रस्त्यावर अचानकपणे धावत्या दुचाकीचे हॅँडल व शॉकअप निघाले, त्यामुळे पुढे बसलेला यज्ञेश रस्त्याच्याकडेला असलेल्या दगडावर आदळला. कपाळाला जबर जखम झाल्याने तो जागेवरच गतप्राण झाला तर राजू व माधुरी यांच्याही डोक्याला मार लागला. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी हा अपघात पाहताच तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सुरक्षा रक्षक व फार्मासिस्ट नसल्याने वादाच्या घटना
रात्रपाळीच्या ड्युटीत औषधांचे वाटप करण्यासाठी औषध निर्माता (फार्मासिस्ट) नसल्याने वादाच्या घटना घडतात.
जिल्हा रूग्णालयात रात्री येणारा प्रत्येक रुग्ण गंभीर असतो. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक जण असतात. वेळेत उपचार मिळाला नाही तर वाद व मारहाणीच्या घटना घडतात. अशावेळी सुरक्षा रक्षकही नसतात. वारंवार पत्र देऊनही त्याची दखल घेतली नसल्याचे आपत्कालिन कक्षाच्या परिचारिका प्रमुख सुरेखा लष्करे यांनी सांगितले.
उपचारावरुन उडाला गोंधळ
जिल्हा रुग्णालयात दाखल करताना तिघांवर एकाचवेळी उपचार करताना अडचणी निर्माण झाल्याने जखमींना दाखल करणाºया लोकांचा कर्मचाºयांशी वाद झाला. या वादात जखमींवर उपचारास विलंब होत होता. सुरक्षा यंत्रणा मात्र नावालाच होती. लहान मुलाला तपासले असता तो मृत झालेला होता. माझा एकुलता मुलगा आहे, त्याच्यावर उपचार करा असे आई, वडील सांगत असताना उपचार करणाºया डॉक्टर व परिचारिकांनाही गहिवरुन आले होते. वादविवाद झाल्यानंतर जखमींसोबत आलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले, त्यानंतर पती-पत्नीवर उपचार करण्यात आले. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, पती-पत्नीचा आक्रोश पाहता मुलगा मृत झाल्याची माहिती त्यांना बराच वेळ देण्यात आली नाही. आपत्कालिन कक्षाच्या परिचारिका प्रमुख सुरेखा लष्करे यांनी त्यांना धीर देत नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.

Web Title: Running bicycle handle ran; A child dies in a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.