जादा गतीने रेल्वे चालविण्याची चाचणी - डी.के. शर्मा

By admin | Published: January 15, 2017 12:54 AM2017-01-15T00:54:36+5:302017-01-15T00:54:36+5:30

शनिवारी भुसावळ विभागातील निफाड-मनमाड दरम्यान 120 प्रती कि. मी. वेगाने रेल्वे गाडी चालवून रेल्वे ट्रॅकची चाचणी घेण्यात आली

Running speed train test - DK Sharma | जादा गतीने रेल्वे चालविण्याची चाचणी - डी.के. शर्मा

जादा गतीने रेल्वे चालविण्याची चाचणी - डी.के. शर्मा

Next

भुसावळ,   : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जादा वेगाने प्रवासी गाडय़ा चालविण्याची शक्यता गृहीत धरुन शनिवारी या विभागातील निफाड-मनमाड दरम्यान 120 प्रती कि. मी. वेगाने  रेल्वे गाडी चालवून रेल्वे   ट्रॅकची  चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के. शर्मा यांनी शनिवारी भुसावळ रेल्वेस्थानकावर पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभी मध्य रेल्वेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.
डी.के. शर्मा यांनी  सांगितले की, या तपासणी दौ:यात  रेल्वेचे विद्युत, लेखा विभाग, यांत्रिक, अभियांत्रिकी, सुरक्षा, संरक्षा (सेफ्टी), अभियांत्रिकी, कार्मिक आदी विभागाचे मुंबई मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या पाहणी दौ:यात रेल्वे ट्रॅक, प्रवाशांसाठी  देण्यात आलेल्या सोयी-सुविधा, ओएचई आदींची पाहणी व तपासणी करण्यात आली.
भविष्यात रेल्वे गाडीचा वेग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन निफाडपासून 25 कि.मी. अंतरार्पयत 120  प्रती तास वेगाने रेल्वे चालवून इंजीन, डबे व  रेल्वे ट्रॅकची चाचणी घेण्यात आली. सध्या आपण 110 कि.मी.प्रती तास वेगाने गाडी चालवित आहोत. गाडय़ांची गती वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला नरेंद्र पाटील, भुसावळचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता, एडीआरएम अरुण धार्मिक, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यालयातील सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लिफ्टचा वापर
विशेष म्हणजे शर्मा यांचे फलाट क्रमांक आठवर आगमन झाले. नवीन रेल्वे उड्डाणपुलावरुन  ते पायी आले. त्यांनी फलाट क्रमांक तीनला जोडलेल्या  लिफ्टचा वापर करून ते खाली उतरले. एकप्रकारे त्यांच्याच हस्ते लिफ्टचे लोकार्पण झाले. रेल्वे स्थानकावरील विशेष कक्षात खासदार रक्षा खडसे यांनी डी.के. शर्मा यांच्याशी रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा केली. भुसावळातील आराधना कॉलनीतील सबवेबाबतही त्यांनी पाठपुरावा केला.
दरम्यान, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन, एससीएसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, रेल कामगार सेना, रेल्वे कर्मचारी ओबीसी संघटना, प्रवासी संघटना प्रतिनिधींनी शर्मा यांची  घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.  (प्रतिनिधी)

Web Title: Running speed train test - DK Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.