तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा : डॉ.अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 09:27 PM2018-07-14T21:27:29+5:302018-07-14T21:32:18+5:30

शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढण्याचे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.

Rural areas should be considered for making technology: Dr. Anil Kakodkar | तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा : डॉ.अनिल काकोडकर

तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा : डॉ.अनिल काकोडकर

Next
ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित परिसंवादशेती व उद्योग युगानंतर ज्ञानप्रधान युगाची सुरूवाततंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा

जळगाव : शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढण्याचे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.
डॉ.काकोडकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार, १४ रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्तीनिर्मिती’ या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा.जे.बी.जोशी, सचिव डॉ.ए.पी.देशपांडे, कुलसचिव भ.भा.पाटील उपस्थित होते.

जागतिकस्तरावर विक्रेते म्हणून मोठे व्हा
डॉ.काकोडकर म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत भारतीयांची खरीददार म्हणून मोठी संख्या असली तरी विक्रेते म्हणून संख्या फार छोटी आहे. हे चित्र बदलण्यासाठी विक्रेते म्हणून आपण मोठे व्हायला हवे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित नवीन वस्तू आणि सुविधा आणायला हव्यात.

शेती व उद्योग युगानंतर ज्ञानप्रधान युगाची सुरूवात
पूर्वी शेतीमध्ये आपण जगाच्या पुढे होतो तो काळ आता मागे पडला. उद्योग युगात आपण मागे पडलो पण आता हळूहळू सावरत असलो तरी तळाला आहोत. शेती आणि उद्योग प्रधान ही दोन्ही युगे मागे पडून ज्ञानप्रधान युग सुरु आहे. या युगात मोठी आव्हाने उभी आहेत. प्रगत देश आणि भारतातील दरी या युगात भरुन काढावी लागणार आहे.

तंत्रज्ञान निर्मिती करताना ग्रामीण भागाचा विचार व्हावा
शहरी आणि ग्रामीण भागात मोठी आर्थिक विषमता आहे. देशाची दोन तृतीयांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या ज्ञान युगात तंत्रज्ञान निर्मिती करताना केवळ शहरी भागाचा विचार करुन चालणार नाही, तर ग्रामीण भागाचा प्राधान्याने विचार करावा लागेल असे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर ग्रामीण व शहरी ही दरी भरुन काढावी लागेल.

Web Title: Rural areas should be considered for making technology: Dr. Anil Kakodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.