पोळ्यासाठी साहित्य खरेदीला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:50 PM2019-08-28T16:50:14+5:302019-08-28T16:51:04+5:30

शेतीत मशागतीच्या कामांसाठी राबराबणाऱ्या शेतकºयाच्या जीवाभावाचा मित्र सर्जाराजा अर्थात बैलपोळा सण येत्या ३० आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार असून, यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

 Rush to buy materials for the hive | पोळ्यासाठी साहित्य खरेदीला गर्दी

पोळ्यासाठी साहित्य खरेदीला गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देबाजारपेठेत दुकाने सजलीपावसामुळे शेतकरी दिसतोय बाजारपेठेत

भडगाव, जि.जळगाव : शेतीत मशागतीच्या कामांसाठी राबराबणाऱ्या शेतकºयाच्या जीवाभावाचा मित्र सर्जाराजा अर्थात बैलपोळा सण येत्या ३० आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार असून, यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.
पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून, रंगवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा या भागात कायम आहे. बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्री करणारी दुकाने बाजारपेठेत थाटली आहेत.
यंदा अंतिम टप्प्यात पाऊस चांगला होत असल्याने सध्या बळीराजा समाधानी आहे. यामुळे बाजारपेठेत उलाढालही होत आहे.
दुकानांवर साहित्य घेण्यासाठी शेतकºयांची गर्दी दिसत आहे. बैल सजविण्यासाठी दोरखंड, नाथ, शिवदा, घुंगरू, घंटे, मोरखी, गेठा, भवरकडी, गेजपट्टा, घाटीघुंगर, घुघरपट्टा, खुटदोर तसेच बैलांची शिंगे रंगविण्यासाठी आॅईल पेंट आदी साहित्य घेताना शैतकरी धावपळ करताना दिसत आहेत. दुकानदारांचाही चांगला व्यवसाय होताना दिसत आहे.

Web Title:  Rush to buy materials for the hive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.