रुस्तमजी इंटरनॅशनल, ओरियन स्कूल विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 06:31 PM2017-09-14T18:31:22+5:302017-09-14T18:54:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज ट्रॉफी जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी ओरियन स्कूल आणि रुस्तमजी इंटरनॅशनलने विजय मिळवला.
अनुभूती स्कूलच्या मैदानावर हे सामने झाले. सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात ओरियन स्कूलने अनुभूती इंग्लिश स्कूलचा पराभव केला. अनुभूती स्कूलच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७ षटकांत सर्वबाद ४२ धावा केल्या. त्यात रोशन पवार याने ७ धावा केल्या अनुभूतीच्या संघाकडून ही सर्वोच्च धावसंख्या होती. ओरियनच्या गोलंदाजांनी तब्बल २४ अतिरिक्त धावा दिल्या. त्यामुळे अनुभूती स्कूलचा संघ ४२ धावांचा आकडा गाठू शकला.
ओरियनच्या आदित्य विसपुते याने हॅट्ट्रिक केली. हर्षवर्धन मालू याने दोन तर ऋषिकेश माळी, गोविंद निंभोेरे, सुबोध खडके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात ४३ धावांचे माफक आव्हान ओरियन स्कूलच्या संघाने ५.४ षटकांत एकही गडी न गमावता पूर्ण केले. त्यात गोविंद निंभोरे याने २३ धावा केल्या. तर पार्थ देवकर याने ६ धावांचे योगदान दिले. हॅट्ट्रिक घेणाºया आदित्य विसपुते याला सामनावीर घोषित करण्यात आले.
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलने पंकज ग्लोबल स्कूलचा पराभव केला. रुस्तमजी स्कूलच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १८.१ षटकांत सर्वबाद १०६ धावा केल्या. त्यात यश गुंजन आणि आशिष पेहलानी यांनी १२ धावा केल्या. पंकज ग्लोबल स्कूलनेदेखील तब्बल ४८ अवांतर धावा दिल्या. पंकज स्कूलच्या राज पाटील याने ४ गडी बाद केले. आयुष पाटील याने २ गडी बाद करत त्याला साथ दिली. क्रिश पाटील याने १ गडी बाद केला.
निर्धारीत २५ षटकांत १०७ धावांची गरज असताना पंकज स्कूलचा संघ ९.१ षटकांत ४१ धावांवर सर्व बाद झाला.
रुस्तमजी स्कूलच्या निपूण जैन याने २४ धावा देत सर्वाधिक पाच गडी बाद केले. क्रिश याने दोन तर श्रीनिवास सिसोदे याने १ गडी बाद केला.
पाच गडी बाद करणाºया निपूण याला सामनावीराचा बहुमान देण्यात आला.