सामनेर ग्रामसेवकाचा मनमानी कारभार म्हणून महिलांनी दिला साडी, बांगडय़ांचा आहेर

By admin | Published: May 2, 2017 05:40 PM2017-05-02T17:40:55+5:302017-05-02T17:40:55+5:30

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या महिलांनी ग्रामसेवकास साडी व बांगडय़ांचा आहेर दिला.

Saaris, Bangla's Aamer, women gave women as the head of Gramsevak | सामनेर ग्रामसेवकाचा मनमानी कारभार म्हणून महिलांनी दिला साडी, बांगडय़ांचा आहेर

सामनेर ग्रामसेवकाचा मनमानी कारभार म्हणून महिलांनी दिला साडी, बांगडय़ांचा आहेर

Next

 सामनेर ता. पाचोरा : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ग्रामसभेत  विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या महिलांनी  ग्रामसेवकास साडी व बांगडय़ांचा आहेर दिला. ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.  

गावात 14 व्या वित्त आयोगाचे एकही  काम झाले नाही.  दलित वस्तीत काम झालेले नाही. बेरोजगारांना मुद्रा लोनसाठी लागणारे कागदपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. घरपट्टी-पाणीपट्टी भरुनही वेळेवर त्यांना कागदपत्रे दिली जात नाही. विविध दाखल्यांसाठी दोन-दोन महिने भटकंती करावी लागते.   काही ग्रा.पं. सदस्यांनी घरपट्टी-पाणीपट्टी भरली नसतानाही त्यांना निरंकचा दाखला दिला जात असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. यावेळी सरपंच कविता साळुंखे, उपसरपंच प्रवीण पाटील, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  (वार्ताहर)

Web Title: Saaris, Bangla's Aamer, women gave women as the head of Gramsevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.