‘जॅक्स पॅरो’वर भारी पडला ‘सचिन’
By admin | Published: May 26, 2017 03:42 PM2017-05-26T15:42:13+5:302017-05-26T15:42:13+5:30
‘रिल’लाईफचा सचिन पाहण्यासाठी जळगावकरांची गर्दी : शहरात 18 शो
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26-क्रिकेटच्या 22 यार्डावर तब्बल 24 वर्षे प्रतिस्पर्धी गोलंदाजाना सडो की पडो करणा:या सचिन तेंडुलकर च्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलीयन ड्रीम्स’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. शहरातील चार चित्रपटगृहामध्ये या चित्रपटाचे 18 शो सुरु असून, पहिल्याच दिवशी ‘रिल’ लाईफ च्या सचिनला पाहण्यासाठी जळगावकरांनी चित्रपटगृहांमध्ये गर्दी केली होती. तसेच शुक्रवारीच प्रदर्शित झालेल्या हॉलीवूडच्या ‘पारयट्स ऑफ कॅरीबियन’ च्या ‘जॅक्स पॅरो’वर ‘सचिन’ भारी पडलेला दिसून आला.
शहरातील चित्रपटगृहांमध्ये ‘सचिन अ बिलीयन ड्रीम्स’ ला 80 टक्के प्रेक्षक मिळाले, तर ‘पायरट्स’ ला 50 ते 60 टक्के प्रेक्षकांची गर्दी लाभली असल्याची माहिती आयनॉक्स मल्टीप्लेक्सचे संचालक वैभव शाह यांनी दिली. जेम्स इरस्काईन दिग्दर्शित ‘सचिन अ बिलीयन ड्रीम्स’ या चित्रपटात वेगळा कलाकार न घेता, सचिन च्याच क्रिकेट जीवनातील काही प्रसंग या चित्रपटात शुट करून डॉक्युमेंट्री च्या स्वरूपात हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. तिकीट खिडकी वर ‘बाहुबली 2’ च्या त्सुनामीचा जोर कमी झाल्यानंतर बहुप्रतिक्षीत असलेल्या ‘सचिन’ चित्रपट पाहण्यासाठी शहरातील आयनॉक्स व नटवर मल्टीप्लेक्समध्ये एका दिवसाआधीच बुकींग सुरु करण्यात आली होती. तसेच शनिवार व रविवारच्या सुट्टय़ा पाहता दोन्ही दिवस या चित्रपटाची 50 ते 60 बुकींग झाल्याची माहिती नटवरचे इंद्रवधन त्रिवेदी यांनी दिली.