पारोळ्याजवळ १८ लाखांच्या लुटीचा बनाव फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:20 AM2019-12-25T01:20:01+5:302019-12-25T01:45:02+5:30

सबगव्हाण गावानजीक हवालाचे १८ लाख रुपये घेऊन येणाऱ्या एका कपाशी व्यापाºयाच्या माणसाला दोन जणांनी मिरचीची पूड फेकून लुटल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला.

Sadguru Smriti Festival started at Nahavi in Yaval taluka | पारोळ्याजवळ १८ लाखांच्या लुटीचा बनाव फसला

पारोळ्याजवळ १८ लाखांच्या लुटीचा बनाव फसला

googlenewsNext
ठळक मुद्देसबगव्हाण येथील घटनातीन जणांना अटकपोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला

पारोळा, जि.जळगाव : येथील आशिया महामार्ग ४६ वर सबगव्हाण गावानजीक हवालाचे १८ लाख रुपये घेऊन येणाऱ्या एका कपाशी व्यापाºयाच्या माणसाला दोन जणांनी मिरचीची पूड फेकून लुटल्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कथित रस्तालूट २४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली.
याबाबत वृत्त असे की, चोरवड, ता.पारोळा येथील कपाशी व्यापारी सुभाष पाटील यांचे कपाशी व्यवसायाचे हवालाचे धुळे येथे आलेले १८ लाख रुपये भागवत चित्ते व अन्य एक जण दुचाकीने धुळे येथून पारोळा येथे आणत होते. सबगव्हाण गावानजीक दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकल थांबवून, त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांच्याकडील १८ लाख रुपये घेऊन पळ काढला, असे भागवत चित्ते याने पोलिसांना सांगितले. पण चित्ते हा हे सांगत असताना तो काही तरी बनाव करीत आहे, हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला खरा प्रकार काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी ‘खाकी’चा हिसका दाखविला. तेव्हा चित्ते हा पोपटासारखा बोलू लागला. त्याने हा सर्व प्रकार बनाव केल्याचे लक्षात आले. खरा प्रकार उघडकीस आला. त्याने उंदिरखेडे, ता.पारोळा येथील संदीप परदेशी याने ही लूट केल्याची सांगितले. तेव्हा पारोळा पोलीस पथक हे उंदिरखेडे येथे गेले असता त्या ठिकाणी संदीप परदेशी नसून, तो दीपक परदेशी होता. त्याने घरातून १७ लाख ९६ हजार रुपये रोख रक्कम काढूून दिली.
त्यासोबत आणखी एक अनिल बाबूसिंग परदेशी रा.चाळीसगाव हा उंदिरखेडे येथे बहिणीकडे आला होता. या बनावट लूट प्रकरणात भागवत चित्ते (वय ४३, रा.पारोळा, दीपक परदेशी (वय ३४, रा.उंदिरखेडे, ता.पारोळा), अनिल बाबूसिंग परदेशी (वय २३, रा.चाळीसगाव) या तिघांना पारोळा पोलिसांनी अटक केली.
या वेळी पोलीस पथकात पोलीस कॉन्स्टेबल सुनील साळुंखे, पंकज राठोड, विजय शिंदे, सुनील वानखेडे, अनिल वाघ आदींनी या बनावट प्लॅनमधील तिन्ही आरोपींना अटक केली. या वेळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Sadguru Smriti Festival started at Nahavi in Yaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.