पीक विमा भरण्यास अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:38 AM2017-07-31T01:38:42+5:302017-07-31T01:42:31+5:30

शेतकरी उदासीन : चार दिवसांपासून आॅनलाइन साईट बंदच; आॅफलाइनसाठीही फिरवाफिरवच | पीक विमा भरण्यास अल्प प्रतिसाद

पीक विमा भरण्यास अल्प प्रतिसाद

Next
ठळक मुद्देपीकविमा भरण्यासाठी शेतकºयांची धावपळअनेक ठिकाणी शेतकºयांचा अल्प प्रतिसादपिक विम्याचा पूर्वीचा वाईट अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : पीक विम्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत असल्याने रविवारीही सर्व व्यापारी तसेच जिल्हा बँकेच्या शाखा पीक विमा भरून घेण्यासाठी सुरू ठेवण्यात आल्या होत्या, त्यास शेतकºयांचा थंड प्रतिसाद मिळाला. दरम्यान, पीक विम्याची ‘अ‍ॅग्री इन्शुरन्स डॉट जीओव्ही डॉट इन’ ही वेबसाईट चार दिवसांपासून बंदच असल्याने केवळ आॅफलाइनच अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली. आॅफलाइन अर्ज भरण्यासाठीही फिरवाफिरव केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
वावडदा जिल्हा बँक शाखेचे कामकाज रविवारीदेखील सुरू होते. तसेच व्यापारी बँकांच्या (राष्टÑीयकृत) कृषी शाखाही सुरू होत्या. त्यात पीक विमा भरण्यासाठी शेतकरी येत होते. मात्र, प्रतिसाद अल्प असल्याचे दिसून आले.
स्टेट बँकेत केवळ कोरा उतारा असलेल्यांचा पीक विमा
स्टेट बँक जळके शाखेत बँकेचा थकबाकी असल्यास अथवा सातबारा कोरा असल्यासच पीक विमा घेतला जात असल्याची तक्रार शेतकºयांनी केली. याबाबत वडली येथील विविध कार्यकारी सोसायटी सदस्य रमेश पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, त्यांच्या एका सातबारावर विविध कार्यकारी सोसायटीच्या थकबाकीची नोंद आहे. त्यावर पीक विमा काढण्यास स्टेट बँकेच्या जळके शाखा व्यवस्थापकांनी नकार दिला. जर स्टेट बँकेचे थकबाकीदार असाल, अथवा सातबारा कोरा असेल तरच विमा काढू, असे सांगितले. याबाबत ‘लोकमत’ने शाखा व्यवस्थापक रॉबिनसिंग यांच्याशी संपर्क साधला असता, शासन निर्णयातच तसे नमूद असल्याचा दावा त्यांनी केला.
पीक विम्याला अल्प प्रतिसाद
मागील वर्षी कापसाला मुक्ताईनगर परिसरात जास्त नुकसान भरपाई मिळाली. याउलट म्हसावद मंडळात शेतकºयांनी जेवढी रक्कम विम्याची भरली, तेवढीच परत मिळाली. त्यामुळे नाराजी आहे. असाच अनुभव अनेक ठिकाणच्या शेतकºयाचा असल्याने पीकविम्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. पीक विम्याच्या बदललेल्या निकषांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात अथवा तसा विश्वास निर्माण करण्यात विमा कंपनीला व कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाला अपयश आले असल्याचे यातून समोर आले आहे.
सर्व बँकांच्या शाखा सुरू
शासनाच्या निर्णयानुसार पीक विम्यासाठी रविवारीदेखील सर्व बँका सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा बँकेच्या शाखा रविवारीदेखील सुरू होत्या. तसेच व्यापारी बँकांच्या कृषी शाखा सुरू होत्या. त्यात स्टेट बँकेच्या ४० शाखांचा समावेश होता.
जिल्हा बँकेकडून २५ हजार शेतकºयांचा पीक विमा
जिल्हा बँकेने शनिवारपर्यंत २४ हजार ४५४ कर्जदार सभासदांचा ३० हजार ४९४. २६ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला आहे. हा विमा कर्ज देतानाच काढण्यात आला आहे. त्यापोटी ४ कोटी ३८ लाख ५८ हजार ४१३ रुपयांचा हप्ता विमा कंपनीला भरण्यात आला आहे. तर बिगर कर्जदार ५०२ सभासदांचा ७९३.१५ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढण्यात आला असून त्यापोटी ११ लाख ३८ हजार ९६३ रुपयांचा हप्ता विमा कंपनीला भरण्यात आला आहे.
तर उद्दिष्ट झाले असते पूर्ण
जिल्ह्यात सुमारे ५ लाख १४ हजार ९७ खातेदार आहेत. त्यापैकी ४ लाख ९२ हजार विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद आहेत, म्हणजेच तेवढेच जिल्हा बँकेचेही खातेदार आहेत. त्यापैकी ३ लाख ८६ हजार कर्जदार आहेत. मात्र, पीक विमा केवळ १ एप्रिल २०१७ नंतर नव्याने कर्ज घेणाºया शेतकºयांना सक्तीने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जर थकबाकीदारांनाही शासनाने पीक विम्याची रक्कम थकबाकीत जमा करीत विमा सक्तीचा केला असता, तर किमान ८० टक्के तरी उद्दिष्ट सहज साध्य झाले असते.
नंदुरबारात भरणा न करणाºयांकडून शपथपत्र
जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी दिवसभर बँकांचे कामकाज सुरू होते़ पीक विमा भरणा करण्यासाठी शेतकºयांनी बँकेत हजेरी लावली़ जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांनी यापूर्वीच पीक विमा केला असल्याने रविवारी बँकांमध्ये तुरळक गर्दी होती़
रविवारी दिवसभर बँकेत कामकाज पूर्ण करत असताना, पीक विम्याचा लाभ नको असलेल्या लाभार्थींकडून तसे लिहून घेण्यात आले आहे़ मोड येथील १० लाभार्थींनी बँकेला तसे लिहून दिले़ इतर ठिकाणीही लाभ नको असलेल्या शेतकºयांनी बँकेला लेखी दिले होते़
जिल्ह्यात पीक विमा करण्यासाठी यंदा ३३ हजार पात्र शेतकरी आहेत़ यात निम्म्याहून अधिक शेतकºयांनी १ जुलैनंतर पीक विमा करण्याचे कामकाज पूर्ण केले होते़ यामुळे जिल्ह्यातील विविध १२ राष्ट्रीयकृत बँकांच्या शहरी आणि ग्रामीण भागातील शाखांमध्ये रविवारी तुरळक गर्दी दिसून आली़
शहादा, नंदुरबार, तळोेदा, नवापूर, धडगाव आणि अक्कलकुवा या तालुक्यातील बँकांमध्ये हे कामकाज पूर्ण करण्यात आले़ जिल्ह्यातील ३५ हजार शेतकºयांना गेल्या वर्षी पीक विम्याचा परतावा मिळाला असल्याने यंदाही शेतकºयांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला होता़
जामनेरात फिरवली पाठ
३१ जुलैपर्यंत शेतकºयांना पीक विम्याची रक्कम भरता यावी, यासाठी रविवार असूनदेखील शहरातील सर्व बँका सुरू होत्या. मात्र, पीक विम्याबाबत पूर्वीचा अनुभव चांगला नसल्याने शेतकºयांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. शेतकºयांची बँक म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा बँकेच्या शाखेतही शुकशुकाटच होता.
धरणगावला राष्ट्रीय पीक विम्याचे ५०० अर्ज दाखल
बँकांना रविवारची सुट्टी असताना मात्र राष्ट्रीय पीक विमा योजनेचा लाभ शेतकºयांना मिळावा, यासाठी सुट्टी रद्द करून पीक विम्याचे आॅफलाइन अर्ज येथील बँकांनी स्वीकारले. धरणगाव जिल्हा बँकेच्या शाखेत अदमासे ५०० शेतकºयांचे अर्ज बँकेने स्वीकारले.
या शेतकºयांच्या खात्यावर वैयक्तिक कर्ज वाढवून विम्याची रक्कम एकूण तीन लाख ९१ हजार ३९७ रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. मात्र, काही संस्थांनी ठराव करून या योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला आहे़


 

Web Title: शेतकरी उदासीन : चार दिवसांपासून आॅनलाइन साईट बंदच; आॅफलाइनसाठीही फिरवाफिरवच

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.