जळगाव सीए शाखेच्या अध्यक्षपदी सागर पाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:54 PM2020-02-22T12:54:54+5:302020-02-22T12:56:07+5:30
सचिवपदी विकी बिर्ला
जळगाव : जळगाव सीए शाखेच्या अध्यक्षपदी सागर पाटणी यांची निवड करण्यात आली. शुक्रवारी त्यांनीमावळत्या अध्यक्षा स्मिता बाफना यांच्याकडून पदभार स्वीकारला.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी झाला. या वेळी विशेष अतिथी म्हणून ‘लोकमत’चे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव उपस्थित होते. या वेळी सीए बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘गो ग्रीन इंडिया’साठी प्रयत्न करणार
अध्यक्षपदाची सूत्रे स्एवीकारल्यानंतर पाटणी यांनी कार्यालयीन कामकाजात ‘पेपरलेस’ कामावर भर देऊन पर्यावरण संतुलन व वेळेच्या बचतीसाठी डिजिटक कामाच्या माध्यमातून ‘गो ग्रीन इंडिया’साठी प्रयत्न केला जाईल, असा मनोदय व्यक्त केला. आगामी वर्षात विविध कार्यक्रमासाठी सर्व सीए बांधव, कार्यकारीणी सदस्य, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सीए शाखेला उज्ज्वल यश मिळवून देऊ, असा विश्वासही व्यक्त केला.
सीए उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ६ मार्च रोजी ‘कॅम्पस प्लेसमेंट’चे आयोजनदेखील करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
सूत्रसंचालन ममता राजानी व करिष्मा ललवाणी यांनी केले.
नूतन कार्यकारीणी
अध्यक्ष - सागर पाटणी, उपाध्यक्ष प्रशांत अग्रवाल, सचिव विकी बिर्ला, खजिनदार व स्टुडंट विंग प्रमुख सौरभ लोढा यांची कार्यकारीणीत निवड करण्यात आली.