सहजीवन.. संगीताला दोन सुरांचे सहजीवन मान्य आहे

By admin | Published: May 28, 2017 03:44 PM2017-05-28T15:44:27+5:302017-05-28T15:44:27+5:30

वीकेण्ड स्पेशलमध्ये पत्र या सदरात जयंत पाटील यांनी केलेले लिखाण.

Sahajivan .. Sangita has accepted the sympathy of two tunes | सहजीवन.. संगीताला दोन सुरांचे सहजीवन मान्य आहे

सहजीवन.. संगीताला दोन सुरांचे सहजीवन मान्य आहे

Next

प्रिय केतू, सप्रेम आठवण

चित्रकार सैयद हैदर रझा म्हणतात, ‘ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो तिला ते पोहोचेर्पयत तास, आठवडे, महिने, कदाचित वर्षही लागू शकतात, परंतु पत्र लिहीत असताना ती व्यक्ती आपल्या इतक्याजवळ, अगदी आपल्यातच असते की ती कोणती व आपण कोणते हे ओळखणं कठीण होऊन बसतं- कधी कधी हा भास इतका तीव्र होतो की वाटतं, तिनं ते वाचलं सुद्धा असेल; आता पत्र पोष्टात टाकण्याची गरजच काय?’ म्हणूनच केतू, हे मनातलं पत्र. 19 जानेवारी 2013 ला तुमचा विवाह झाला. डोक्यावरून पाण्याचा भरलेला घडा उतरवावा इतके मोकळेपण आणि साफल्य तुङया ममा-पपांनी अनुभवले असेल. ‘बँड आणि घोडा नको’ हे माङो म्हणणे त्यांनी मान्य केले, त्याबद्दल त्यांचे आभार. परिसरातील लोकांना आवाजी त्रास देण्याचा अधिकार आपल्याला नसतोच, असे मी मानतो. तुमच्याकडील दोन्ही जेवणे छान होती. सिमंत पूजनच्या रात्रीचे क्लासिकल गाणे असेल तर लगAाचे जेवण सुगम संगीतासारखे होते. मला, शैलजाला आणि आमच्याकडील मंडळींना विवाहविधी लक्षणीय आणि वेगळे वाटले. विवाह  झाला. निरोपाची वेळ आली. माझा लहानभाऊ आणि मी तुङया पपांना आश्वस्त करावे म्हणून म्हणालो, ‘तुम्ही केतकीची काही काळजी करू नका.’ पपा म्हणाले, ‘मला केतकीची काळजी नाही, नीरजच्या आई-बाबांची काळजी आहे.’ आणि आम्ही निघालो. मला बंगाली लेखिका अलका सरावगी यांच्या ‘कलीकथा: व्हाया बायपास’ यातील एक परिच्छेद सारखा आठवत होता. ‘माणसाकडे एक खास गोष्ट असते. नेहमी सत्य बोलणारी एक दुसरी बुद्धी. तिलाच कदाचित आत्मा म्हणत असतील. ती एकदाच सत्य बोलून पुन्हा  शेषशायी विष्णुप्रमाणे झोपून जाते. दुस:यांदा बोलत नाही.’ केतू, आम्ही अतिशय प्रामाणिकपणे तुङो स्वागत केले आहे. थोर गायक स्व.वसंतराव देशपांडे एकदा सांगत होते- संगीतात दोन सूर एक होत नाहीत. लक्षावधी वेळा तंबोरा छेडल्यावर एक असा क्षण येतो की दोन सूर एक होतात, पण त्या क्षणी तंबो:याची एक तार तुटून जाते.. संगीताला दोन  सुरांचे सहजीवन मान्य आहे, एकात्मता मान्य नाही. केतू, जीवनालाही दोन व्यक्तींचे सहजीवन मान्य आहे. एकात्मतेचा अट्टाहास नव्हे! नीरज आणि तू दोघेही वेगवेगळ्या वातावरणातून आला आहात. त्या वातावरणाने तुमचे स्वभाव घडवले आहेत. ते एकच कसे असतील? आणि कितीही अंधार दाटून आला, कोणतीही  परिस्थिती उद्भवली तरी आमची अफाट प्रेम करण्याची शक्ती मात्र तुमच्यावरच राहणार आहे. केतू, आमच्या जगण्याच्या मागावरचा प्रेमाचा धागा अखंड राहो, अशी नियतीकडे प्रार्थना करतो बाळा.. तुङया ममा-पपांना सप्रेम आठवण. तुला आणि नीरजला शुभाशीष.
तुङो आणि नीरजचे आई-बाबा.

Web Title: Sahajivan .. Sangita has accepted the sympathy of two tunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.