मेहूणबारे येथे रंगले शिवार साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:37 PM2018-12-26T21:37:34+5:302018-12-26T21:41:05+5:30
मंदिरांच्या जागांवर विद्येची मंदिरे उभारली जावीत, असे विचार कवी, साहित्यिक उत्तम कोळगावकर यांनी व्यक्त केले.
मेहूणबारे, गणेशपूर,ता.चाळीसगाव : मंदिरांच्या जागांवर विद्येची मंदिरे उभारली जावीत, असे विचार कवी, साहित्यिक उत्तम कोळगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा-चाळीसगाव आयोजित जिल्हास्तरीय शिवार साहित्य संमेलनात मेहुणबारे येथे अध्यक्षपदावरून ते बोलत होते. शेतकऱ्यांनी केवळ शेतीच्या आधाराने, भरवशाने राहू नये. आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे, कामधंदे सोडून देवाच्या नावाने बैठक मारून बसू नये, कर्मकांडात बुडू नये, डोळस असावे,कर्मकांड हेच आपल्या दु:खाचं कारण होऊ शकत म्हणून प्रत्येक गल्लीत मंदिरं बांधण्यापेक्षा विद्यामंदिरं बांधावीत असे ते म्हणाले.
उद्घाटन कवी, गीतकार प्रकाश होळकर यांनी शिवार पूजन करुन केले. प्रसंगी आमदार उन्मेश पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, जि.प.सदस्या मोहिनी गायकवाड, कवी अशोक कोतवाल, प्रा.डॉ. प्र.ज.जोशी व मसाप चाळीसगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
परिसंवादच्या सत्रात कृषीभूषण लोहाºयाचे विश्वास पाटील लोहारा यांनी आपल्या शेतीत केलेल्या विविध प्रयोगांची माहिती सांगितली.
डॉ.जे.सी.राजपूत, प्राचार्य डॉ. सुदाम पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ‘ नली ’ श्रीकांत देशमुख लिखित व हर्षल पाटील यांनी सादर केलेल्या एकपात्रीनं यावेळी उपस्थितांना रडवलं. डोळ्यांच्या कडा ओल्याच होत्या. प्रवीण माळी यांचे आयतं पोयतं सख्यान, डॉ.एस.के.पाटील यांच्या अहिराणी सादरीकरणांनी श्रोत्यांना लोटपोट केल.
समारोपाला माजी आमदार आर.ओ.पाटील, प्रमोद पाटील,कैलास सूर्यवंशी यांनीही संमेलनाला हजेरी लावून मार्गदर्शन केले. बहुभाषिक कवी संमेलनात मान्यवर निमंत्रित कवींनी आपल्या शेत, शेतकरी, शिवार, दुष्काळ याविषयीच्या कविता सादर केल्या. गिरणामाई आणि तिचं कोरडं पात्रही शेतकºयांच्या व्यथा कान देऊन ऐकत होती.