५० वर्षांपासून सुईनचे काम यशस्वीपणे करणाऱ्या मंजूळाबाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:48 AM2019-03-08T00:48:12+5:302019-03-08T00:48:28+5:30
३० वर्षांपूर्वी पतीचे निधन
रुपेश निकम
लोंढे, ता.चाळीसगाव : येथील ७५ वर्षीय अशिक्षित महिला मंजूळाबाई भगवान वानखेडे या गेल्या ५० वर्षांपासून सुईनचे अर्थात परिचारिकेचे काम यशस्वीपणे हाताळत आहेत.
घरात अठराविश्व दारिद्र्य, त्यातच ३० वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. चार मुले आणि एक मुलगी असे मोठे कुटुंब आहे. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशाही परिस्थितीत त्यांनी सुईनच्या कामाला वाहून घेतले. परमेश्वराची देणगी की काय, एखाद्या प्रशिक्षित परिचारिकेत असलेले गुण या मंजूळाबार्इंमध्ये आहेत.
रात्री-बेरात्री केव्हाही परिसरात कोणतीही महिला प्रसूत झाल्यानंतर वा त्याआधी मंजूळाबार्इंना बोलविणे आल्यानंतर त्या आनंदाने जातात. फार पूर्वी ग्रामीण तसेच आदिवासी भागात वैद्यकीय सुविधा नव्हत्या. त्या वेळी त्यांना आवर्जून बोलविले जायचे. असे असले तरी आजही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही.
उर्वरित वेळात मोलमजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात.