साकेगाव गौणखनिज शिवाराची खनिकर्म अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 04:57 PM2019-09-08T16:57:00+5:302019-09-08T16:58:57+5:30
खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी साकेगावजवळील गौणखनिज शिवाराची अचानक पाहणी केली.
भुसावळ, जि.जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी साकेगावजवळील गौणखनिज शिवाराची अचानक पाहणी केली व या शिवारातून नेमके किती गौणखनिज उचल झाले आहे या माहितीचा अहवाल मागविला आहे.
साकेगाव शिवारामध्ये मनमानी पद्धतीने गौनखनिज उचल करण्यात येत आहे. परवानगी (रॉयल्टी) १० ब्रास घेतल्यानंतर उचल मात्र १०० ब्रास केली जाते. साकेगाव वाघूर नदी पात्र व शिवार वाळूमाफियांनी वाटेल त्या ठिकाणी मनमानी पद्धतीने उचल केली आहे. रात्री वाळू, गौणखनिजाची परवानगी नसताना, रात्री अंधाराचा फायदा घेत शेकडो ब्रास गौणखानिज साफ करून टाकले आहे.
या परिसरातून कोणास किती गौणखनिजाची परवानगी दिली होती व किती प्रमाणात उचल झालेला आहे, तसेच कोणकोणत्या ठिकाणी वाळूचे साठे मारलेले आहे, मुरुम, डबर, वाळू, माती याची गुप्त माहिती महसूल प्रशासन प्राप्त झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासह भुसावळ तालुक्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने गौणखनिजाची उचल केली जात आहे याच्यावरही करडी नजर आहे. वाळूमाफियांचीही माहिती घेतली जात आहे. कोणाकोणावर कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान महसूल प्रशासनातर्फे अचानक नदीच्या दºयाखोºयामध्ये प्रशासनाची गाडी आल्यामुळे, अवैद्य गौणखनिज उचल करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.
याप्रसंगी साकेगाव तलाठी हेमंत महाजन उपस्थित होते.