तेलंगाणाच्या वयोवृद्धाला साकेगावकरानी दिला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 06:09 PM2020-08-12T18:09:13+5:302020-08-12T18:17:36+5:30
तेलंगाणाच्या वयोवृद्धाला साकेगावकरानी आधार दिला.
Next
ठळक मुद्दे'लोकमत'च्या माध्यमातून पटली ओळखसिनेस्टाईल कहाणीत व्हीडिओ कॉलिंगने गहिवरले पिता-पुत्र
<
br />वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : एका सिनेमाच्या पटकथेला शोभेल अशा पद्धतीने आंध्रप्रदेश (तेलंगणा) येथील वयोवृद्ध महाराष्ट्रात कोरोना काळात भरकटल्यानंतर साकेगाव येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात देत सांभाळ केला. ह्यलोकमतह्णला विषय कळता क्षणी अवघ्या १० मिनिटात वयोवृद्धांची ओळख पटवून व्हिडिओ कॉलिंगद्वारे पिता पुत्रांचे संभाषण झाले. या कहाणीने पितापुत्र गहिवरले.
साकेगाव बसस्थानक चौकात गेल्या चार दिवसांपूर्वी एक तेलंगणाचे वयोवृद्ध घाबरलेल्या मनस्थितीत भरकटत आले. रात्रीच्या वेळेस एक अनोळखी वयोवृद्ध आल्याने बाजूलाच किराणा दुकानचालक नामदेव हडप यांनी त्यांची विचारपूस केली. मात्र भाषा समजत नसल्यामुळे त्रास झाला. त्यांना जेवणाची व राहण्याची नितांत गरज आहे. माणुसकी धर्मातूून हडप यांनी लागलीच व्यवस्था केली. वृद्धबाबांचा गेल्या तीन दिवसांपासून सांभाळ केला. १२ रोजी वयोवृद्धाबाबत त्यांनी सामाजिक कार्यकर्ते हाजी रमजान पटेल यांच्याकडे विषय काढला. पटेल यांनी ह्यलोकमतह्णचे भुसावळ प्रतिनिधी वासेफ पटेल यांना याबाबत माहिती दिली. पटेल यांनी त्वरित त्यांच्या जिल्ह्याचे, तालुक्याच्या नावाची माहिती काढून इंटरनेट व आंध्र प्रदेशच्या काही लोकांच्या संपर्कातूून शेवाला पोलीस ठाण्यामध्ये घटनेची माहिती दिली व त्यांचे फोटो पाठविले. अवघ्या पाच मिनिटांनंतर शेवाला, ता.जि.रंगारेड्डी येथून पोलीस अधिकारी सी.एच. बालकृष्णा यांचा लोकमत प्रतिनिधी वासेफ पटेल यांना कॉल आला. त्यांनी ही व्यक्ती शेवाला तालुक्यातील असल्याचे व त्यांचे नाव खानापूरम रूक्का रेड्डी असल्याचे सांगितले. रेड्डी यांची पोलीस ठाण्यात मिसिंग झाल्याची नोंद असल्याचेही सांगितले.
व्हिडिओ कॉलद्वारे झाले पिता-पुत्रांचे मिलन
घटनेची माहिती शेवाला पोलिसांनी त्यांच्या मुलांना दिली. अवघ्या पाच मिनिटात मुले पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी लोकमत प्रतिनिधी पटेल यांच्या नंबरवर व्हिडिओ कॉल केला. पिता-पुत्रांनी एकमेकांशी पाच मिनिटांपर्यंत गप्पा मारल्या. वडील संतापात मुलावर रागवत होते. मुलगा ढसाढसा वडिलांच्या विरहाने रडत होता. हो भावनिक क्षण बघून शेवाला पोलीस तसेच साकेगावचे स्थानिक ग्रामस्थ यांच्या डोळ्यातून अश्रूनी वाट मोकळी केली.
उपस्थितांना आले गहिवरून
तेलगू भाषेत मला घरी लवकर घेऊन जा, असं वडील मुलगा लिंगा रेड्डी यांना ठासून सांगत होते व तो म्हटला, बाबा मी लगेच गाडी घेऊन निघतो. त्यांच्या भावनिक संभाषणातून उपस्थितांचे मन गहिवरून आले.
साकेगावकरांकडून माणुसकीचा हात
बसस्थानक चौकातील दुकानदार नामदेव हडप यांनी गेल्या चार दिवसापासून रेड्डी या वयोवृद्धांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. अगदी घरच्या सदस्यांसह प्रेम दिले. तसेच बाजूलाच असलेले अण्णा खंबायत यांनी वयोवृद्धांची कटिंग, दाढी केली. वसीम पटेल याने नेहमी चहाची, पाण्याची जबाबदारी घेतली. याशिवाय प्रमोद पाटील यांना यांनी चप्पल व इतर साहित्याची जबाबदारी घेतली. याशिवाय गजानन पवार यांनी जेवणासह हडप यांना वयोवृद्धांसाठी काय मदत हवी याबाबत सतत विचारणा केली व त्यांना सहकार्य केले. रमजान पटेल यांनी त्वरित माहिती देत ओळख पटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली .
साकेगावकरांच्या माणुसकीमुळे एका वयोवृद्धाला त्यांच्या कोरोना काळामध्ये परिवाराची भेट होणार आहे याचे समाधान साकेगावकऱ्यांमध्ये दिसून आले.
बाबांना केले चकाचक
वयोवृद्ध बाबांची ओळख पटताच मला माझ्या घरी जायचे आहे याची ओढ बाबांना लागली आहे. लगेच साकेगावकऱ्यांनी त्यांना नवीन कपडे, कटिंग, दाढी करून बूट वगैरेची व्यवस्था केली. तसेच पोषण आहार त्यांना दररोज देण्यात येत आहे.
तालुका पोलिसांकडून कौतुक
डीवायएसपी गजानन राठोड व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना घटना समजताच त्यांनी साकेगावकरांचे कौतुक केले. तसेच याबाबत शासकीय प्रक्रिया केल्यानंतर आंध्रप्रदेश (तेलंगाणा) येथून निघालेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.