जळगावनजीक महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात साकरीची महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:31 PM2017-12-10T16:31:50+5:302017-12-10T16:35:18+5:30

जळगाव येथील दवाखान्यात निमोनिया आजारावरील उपचार करुन घरी दुचाकीने मुलासोबत जात असताना मागून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत रेखा सुनील नारखेडे (वय ४० रा.साकरी, ता.भुसावळ) या ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजता नशिराबाद गावाजवळ महामार्गावर झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींचे हॅँडल एकमेकात अडकले होते.या अपघातात मुलगा किरण हा सुदैवाने बचावला आहे. त्याला किरकोळ खरचटले आहे.

Saki women killed in a two-wheeler accident on the Jalgaon highway | जळगावनजीक महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात साकरीची महिला ठार

जळगावनजीक महामार्गावर दोन दुचाकीच्या अपघातात साकरीची महिला ठार

Next
ठळक मुद्देनशिराबादजवळ अपघात दवाखान्यातून उपचार करुन जात असताना झाला अपघातमुलगा बचावला

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१० : जळगाव येथील दवाखान्यात निमोनिया आजारावरील उपचार करुन घरी दुचाकीने मुलासोबत जात असताना मागून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत रेखा सुनील नारखेडे (वय ४० रा.साकरी, ता.भुसावळ) या ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजता नशिराबाद गावाजवळ महामार्गावर झाला. या अपघातात दोन्ही दुचाकींचे हॅँडल एकमेकात अडकले होते.या अपघातात मुलगा किरण हा सुदैवाने बचावला आहे. त्याला किरकोळ खरचटले आहे.
याबाबत सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, रेखा नारखेडे यांना निमोनिया झाल्याने त्या शनिवारी मुलगा किरण याला घेऊन दुचाकीने जळगावात आल्या होत्या. शनिवारी डॉक्टरांकडे उपचार केल्याने नातेवाईक पंकज मराठे यांच्याकडे त्या थांबल्या. सकाळी उठून घरी जात असताना नशिराबाद गावाजवळ जळगावकडूनच आलेल्या दुचाकीने किरण याच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकींचे हॅँडल एकमेकात अडकल्याने रेखा नारखेडे या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यात डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तेथून जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, रेखा यांच्या पश्चात पती सुनील नारखेडे, मुलगा किरण, विशाल व रुपेश असा परिवार आहे. पती हे हातमजुरी करतात तर मोठा मुलगा किरण हा आयटीआय झालेला आहे. अन्य दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत.

Web Title: Saki women killed in a two-wheeler accident on the Jalgaon highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.