कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:05+5:302021-06-29T04:12:05+5:30
यावेळी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील या सर्वांच्या उपस्थितीत ...
यावेळी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील या सर्वांच्या उपस्थितीत गोदावरी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे निवेदन दिले.
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचा वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते. त्याचे श्रेय आमदार नाना पटोले यांना असल्याचे संघटना प्रतिनिधींनी सांगितले. सेवानिवृत्त होणाऱ्या कनिष्ठ प्राध्यापक त्याचबरोबर ज्या प्राध्यापकांना आपल्या प्रॉव्हिडंट फंड वैद्यकीय कारणासाठी वा स्वतःच्या वैयक्तिक अडचणीसाठी कर्जरूपाने काढायचा असेल, अशांना तो सद्यस्थितीत मिळत नाही. यासाठी शासनाने ती वेबसाईट लवकरात लवकर सुरू करावी, असा आग्रह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरला. जवळपास आठ समस्या कनिष्ठ प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांना निवेदन देताना मांडल्या.
शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील सोनार, सचिव प्रा. शैलेश राणे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, प्रा. भारुडे, प्रा. प्रशांत वंजारी, विनाअनुदानित कृती समितीचे प्रा. अनिल परदेशी, प्रा. महाजन यांनी केले.
===Photopath===
280621\img-20210627-wa0039.jpg
===Caption===
ज्युकटो संघटनेतर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे वेतन राष्ट्रीयाकृत बँकेतुन सीएमपी प्रणालीद्वारे व्हावे यासाठी नामदार नाना पटोले यांना निवेदन देतांना संघटनेचे पदाधिकारी