१३ वर्षांपासून वेतन प्रलंबित : शिक्षकाची विद्यार्थ्याच्या शेतात मजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:25 AM2019-08-12T05:25:39+5:302019-08-12T05:25:51+5:30

विनाअनुदानित शाळांना अनुदान नाही, त्यामुळे पगार नाही. पर्यायाने शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाला विद्यार्थ्याच्या शेतात मजुरीवर काम करावे लागत आहे.

Salary pending for 6 years: Teacher's field wages | १३ वर्षांपासून वेतन प्रलंबित : शिक्षकाची विद्यार्थ्याच्या शेतात मजुरी

१३ वर्षांपासून वेतन प्रलंबित : शिक्षकाची विद्यार्थ्याच्या शेतात मजुरी

Next

जळगाव : विनाअनुदानित शाळांना अनुदान नाही, त्यामुळे पगार नाही. पर्यायाने शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाला विद्यार्थ्याच्या शेतात मजुरीवर काम करावे लागत आहे. उदरनिर्वाहासाठी सकाळी महाविद्यालयात बिनपगारी नोकरी व दुपारी शेतात मजुरी करावी लागत असल्याची व्यथा दिनेश आर. पाटील यांनी ‘लोकमत’कडे मांडली.
शिक्षक पाटील हे एका शेतात फवारणी करीत असल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २००६ पासून ते या ठिकाणी अकाऊंट हा विषय शिकवितात़ गेल्या तेरा वर्षांपासून त्यांना पगारच मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे़
सकाळी विद्यार्थ्यांना शिकवायचे व दुपारी साडे बारानंतर त्यांच्याच शेतात २०० रूपये रोजाने काम करायचे अशी त्यांची दिनचर्या आहे.

विनाअनुदानित शाळांचा प्रश्न प्रलंबित आहे, आतापर्यंत २२३ आंदोलने केली, मात्र आगामी अधिवेशनात तुमचा प्रश्न मांडूच असे वांरवार केवळ आश्वासने देण्यात आली. मात्र आता लढा तीव्र करणार आहोत, जोपर्यंत ठोस निर्णय निघत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही़
- अनिल परदेशी, नाशिक विभागीय अध्यक्ष,
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती

Web Title: Salary pending for 6 years: Teacher's field wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक