पिण्याच्या पाण्याची जादा दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:58+5:302021-04-26T04:13:58+5:30
ढापा दुरुस्त करण्याची मागणी जळगाव : व.वा.वाचनालयाच्या इमारती जवळ गटारीवरील ढापा तुटल्याने वाहन धारकांना व पायी जाणाऱ्या नागरीकांना अडचणीचा ...
ढापा दुरुस्त करण्याची मागणी
जळगाव : व.वा.वाचनालयाच्या इमारती जवळ गटारीवरील ढापा तुटल्याने वाहन धारकांना व पायी जाणाऱ्या नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेला या ठिकाणी पाय घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने हा ढापा दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
बिबानगरात रविवारीही वीज पुरवठा खंडित
जळगाव : सावखेडा शिवारातील बिबानगरात गेल्या काही दिवसांपासून दररोज अधून-मधून वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. तसेच विद्युत प्रवाह कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रविवारीही या परिसरात दुपारी बराच वेळ वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात उकड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
बस स्थानका बाहेरील पथदिवे बंद
जळगाव : नवीन बस स्थानक समोरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी अंधार निर्माण होत आहे. यावेळी चोरी-लुटमारीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी आगार प्रशासनाने तातडीने हे पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरीकांमधून केली जात आहे.
किसान रेल्वे दररोज सुरू ठेवण्याची मागणी
जळगाव : शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली किसान रेल्वे आठवड्यातून फक्त तीनच दिवस धावत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना परराज्यात मालाची वाहतूक करण्यास विलंब होत आहे. दररोज ही गाडी सुरू राहिल्यास शेतकरी बांधवांना दररोज माल पाठवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे किसान रेल्वे दररोज सुरू ठेवण्याची मागणी शेतकरी बांधवांमधून केली जात आहे.