"रेमडेसिविर"ची चढ्या दराने विक्री : १२ जणांविरूध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:16 AM2021-04-24T04:16:26+5:302021-04-24T04:16:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहरात दोन ठिकाणी छापा टाकून रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणा-या टोळीचा पोलिसांनी ...

Sale of "Remedesivir" at inflated rates: Crime against 12 persons | "रेमडेसिविर"ची चढ्या दराने विक्री : १२ जणांविरूध्द गुन्हा

"रेमडेसिविर"ची चढ्या दराने विक्री : १२ जणांविरूध्द गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव शहरात दोन ठिकाणी छापा टाकून रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यात १२ जणांना अटक करण्‍यात आली असून त्यांच्याकडून ७ रेमडेसिविर इंजेक्शन, दुचाकी, मोबाईल जप्त करण्‍यात आले आहे. त्याचबरोबर भुसावळात देखील दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्‍यात हद्दीत या पथकांनी छापे टाकले होते. पहिल्या पथकाने ९ जणांना तर दुस-या पथकाने तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, संशयितांनी रेमडेसिविर कुठून आणले व या टोळीत आणखी किती जणांना समावेश आहे. याचा पोलीस तपास करीत असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

(उर्वरित वृत्त / शहर हॅलोवर)

Web Title: Sale of "Remedesivir" at inflated rates: Crime against 12 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.