शहरातून चोरलेल्या दुचाकीची बुलडाणा जिल्ह्यात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:51+5:302021-04-26T04:14:51+5:30

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन जणांना अटक ...

Sale of two-wheeler stolen from the city in Buldana district | शहरातून चोरलेल्या दुचाकीची बुलडाणा जिल्ह्यात विक्री

शहरातून चोरलेल्या दुचाकीची बुलडाणा जिल्ह्यात विक्री

Next

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील रोहित पंडीत निंदाने (वय २१ रा. शनिपेठ) हा जळगावातून दुचाकी चोरुन सैय्यद रोशन सैय्यद कादीर (३५) आणि सैय्यद आझाद उर्फ बब्बू सैय्यद कादीर (४३) दोघे रा.नांदुरा जि.बुलढाणा हे दोघे त्याची विक्री करायचे. या तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

या तिघांनी शहरातून चोरलेल्या ९ गाड्या काढून दिल्या आहेत. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या दुचाकी या चोरट्यांचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान तिघांना अकोला पोलिसांच्या ताब्यातून घेतल्यानंतर जळगाव शहर पोलिसांनी त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले. पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. तिघांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतून १, शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून ३, शहर पोलीस स्टेशन ३, नशिराबाद १ आणि भुसावळ पोलीस स्टेशनला १ याप्रमाणे नऊ दुचाकी चोरल्या होत्या. शहर पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्याच्या चौकशी कामी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अक्रम शेख, रतन गिते, भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर यांनी अकोला पोलिसांकडून तिघांना ताब्यात घेतले आहे. चोरलेल्या दुचाकी विक्री केल्यानंतर मिळालेले पैसे तिघेही वाटून घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Sale of two-wheeler stolen from the city in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.