शाळा, महाविद्यालयांमध्ये शिवरायांना वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:44 AM2021-02-20T04:44:38+5:302021-02-20T04:44:38+5:30

मेहरूण परिसरातील राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ...

Salute to Shivaraya in schools and colleges | शाळा, महाविद्यालयांमध्ये शिवरायांना वंदन

शाळा, महाविद्यालयांमध्ये शिवरायांना वंदन

Next

मेहरूण परिसरातील राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपशिक्षिका जयश्री महाजन यांनी केले. सूत्रसंचालन पी.डी. नेहते यांनी तर आभार एस.ए. खंडारे यांनी केले. प्राथमिकचे मुख्याध्यापक सी.व्ही. पाटील उपस्थित होते.

संस्कृती माध्यमिक विद्यालय

मुख्याध्यापिका डिंपल येवले यांनी प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी फालक, ज्योती सोनवणे, सुहास कोल्हे, ईश्वर पाटील, विवेकानंद तायडे, कर्मचारी कविता पाटील, वसंत महाजन यांनी परिश्रम घेतले.

सूजय महाजन प्राथमिक विद्यालय

सूजय महाजन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती पीडीएफ स्वरूपात पाठविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये रोहिणी सपकाळे, देवीदास पवार, सिब्बू यादव, प्रतीक्षा भोलाणकर, काजल पवार आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यशस्वितेसाठी पूजा तवट, हितेश पाटील, मुक्तता देशमुख आदी उपस्थित होते.

मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय

मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी प्रतिमा पूजन केले. विद्यार्थ्यांना मोबाइलवर शिवाजी महाराज यांची संपूर्ण माहिती पाठविण्यात आली. रितेश शिरसाठ, खुशबू तडवी, राकेश गायकवाड, कृष्णा मराठे, पूजा पाटील, जयेश बाविस्कर, संदेश तिवारी आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लीना नारखेडे, अविनाश महाजन, रूपाली वानखेडे, रोहिणी सोनवणे, नरेश कोळी, धनश्री फिरके, दीपक भोळे, तुषार नारखेडे उपस्थित होते.

सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल

सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका साधना महाजन यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षिका सपना नेमाने यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली.

आर. आर. विद्यालय

आर. आर. विद्यालयात मुख्याध्यापक विजय रोकडे यांनी प्रतिमा पूजन केले. उपमुख्याध्यापक डी.टी. पाटील यांनी शिवरायांच्या आज्ञापत्राचे वाचन केले. डी.बी. पांढरे, संजय क्षीरसागर, अरुण सपकाळे, सी.के.पी माळी, एस.एन. चौधरी, सारिका वाणी, मानसी बऱ्हाटे, योगिता बडगुजर, लीना तायडे, चारुलता पाटील, प्रवीण जोशी, दिनकर भोळे, शशिकांत भोसले, मंगेश गंगावणे आदी उपस्थित होते.

जय दुर्गा माध्यमिक विद्यालय

जय दुर्गा प्राथमिक, माध्यमिक व कै. कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालयात प्राथमिकचे मुख्याध्यापक सागर कोल्हे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका ज्योती पाटील उपस्थित होत्या.

मुंदडे विद्यालय

पिंप्राळा उपनगरातील पी.एम. मुंदडे माध्यमिक विद्यालयात अध्यक्ष सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक विठ्ठल राजोळे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा वाघमारे यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. आभार रत्ना बागूल यांनी मानले. रमेश शिरसाठ, गणेश भालेराव, राजेंद्र उंबरकर, ज्ञानेश्वर कुमावत, दिलीप घ्यार, प्रभाकर वाल्डे, संजीव तडवी, बापू बाविस्कर आदी उपस्थित होते.

कमल राजाराम वाणी विद्यामंदिर

प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक रवींद्र माळी व नीलेश नाईक यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. उपशिक्षक राहुल धनगर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. नर्सरी ते ९वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग नोंदविला. यावेळी वेशभूषा, चित्रकला, वक्तृत्व व पोवाडा गायन स्पर्धा पार पडल्या. श्रेयस पांचाळ, समृद्धी भास्कर, पायल राठोड, निशिता पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अश्विनी वाघुळदे हिने हिरकणीचा पोवाडा तर रितू सपकाळे हिने शिवरायांच्या शौर्याचा पोवाडा सादर केला. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र वारके, उज्ज्वला जाधव, वंदना नेहते, श्रीकांत पाटील, रशिदा तडवी, संगीता निकम, सुवर्णा सोनार, ज्योती सपकाळे, छाया पाटील, भूषण बऱ्हाटे यांनी सहकार्य केले.

फोटो आहे.

रत्ना जैन प्राथमिक विद्यालय

दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित प्रतापनगर येथील सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका आशा साळुंखे यांनी शिवाजी महाराज यांनी प्रतिमा पूजन केले.

आदर्श विद्यालय

कानळदा, ता. जळगाव येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य के. पी. चव्हाण यांनी प्रतिमा पूजन केले. उपशिक्षक आर. एन. पाटील आणि ए. आर. चौधरी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख व्ही.जे. पवार यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक के. एम. विसावे उपस्थित होते. आभार आर.व्ही. पाटील यांनी मानले.

Web Title: Salute to Shivaraya in schools and colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.