आचार्य कल्पवृक्षनंदीजी महाराज यांचे समाधी मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:19 AM2021-09-26T04:19:56+5:302021-09-26T04:19:56+5:30
जळगाव : फर्दापूर तांडा, ता.सोयगाव येथील कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्राचे प्रणेते प.पू. आचार्य १०८ कल्पवृक्षनंदीजी महाराज शनिवारी २५ रोजी ...
जळगाव : फर्दापूर तांडा, ता.सोयगाव येथील कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्राचे प्रणेते प.पू. आचार्य १०८ कल्पवृक्षनंदीजी महाराज शनिवारी २५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महानिर्वाण झाले. त्यांच्यावर उद्या रविवार २६ रोजी रोजी दुपारी १ वाजता कल्पवृक्ष कलशाकार क्षेत्रावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराजश्रींनी त्यांचे आद्यगुरू प.पू. आचार्य १०८ दर्शनसागरजी महाराज (सुसनेर, म.प्र.) यांचे सकाळी आशीर्वचन घेतले होते. सोबतच सर्व आचार्य व मुनिश्रींचे उपदेशही घेतले होते. त्यांची सल्लेखना सुरू असतानाच त्याचे संध्याकाळी ७.३० वाजता महानिर्वाण झाले. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी अन्नत्याग (आहारत्याग) केला होता.
पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा येथील ते रहिवासी होते. महाराजश्रींनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, बिहार आदी राज्यात समाज प्रबोधन केले होते. अंतिम दर्शन घेता यावे यासाठी महाराजश्रींचे पार्थिव कल्पवृक्ष क्षेत्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे, असे तीर्थक्षेत्र निर्देशक सपनादीदी व दिगंबर जैन तरुण बहुउद्देशीय मंडळ, जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.