राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक स.ध.भावसार यांना समाजभूषण पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 06:06 PM2018-08-20T18:06:12+5:302018-08-20T18:06:31+5:30
विविध क्षेत्रातील कार्याची समाजाने घेतली दखल
पारोळा : येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना अखिल महाराष्ट्र भावसार समाजातर्फे अमळनेर येथे अध्यक्ष अरुण रामप्रसाद भावसार यांच्या हस्ते महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पहार होते.
या वेळी अमळनेर भावसार समाज अध्यक्ष सुरेश नारायण भावसार, संयुक्त खान्देश भावसार समाज अध्यक्ष ओंकार गणेश भावसार, पारोळा भावसार समाज अध्यक्ष लक्ष्मीकांत भावसार, सेवानिवृत्त पर्यवेक्षक जी.जे. भावसार आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अमळनेर शहादा व जळगाव भावसार समाज आणि लाडशाखीय वाणी समाज अमळनेर येथोल कार्यकारी मंडळाने त्यांचा सत्कार केला. स.ध.भावसार यांची शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील कामगिरी, निरपेक्ष भावनेने समाजासाठी योगदान राज्य व राष्ट्रीय बांधिलकी आणि राबविलेले समाजोपयोगी उपक्रम याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराबद्दल आमदार डॉ.सतीश पाटील, माजी प्राचार्य उल्हास पवार, माजी मुख्याध्यापक युवराज पाटील यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.