जळगावात दशक्रिया चित्रपट दाखवण्यावरून उफाळले मतभेद, संभाजी ब्रिगेड व ब्राह्मण संघटना आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:42 PM2017-11-19T12:42:10+5:302017-11-19T12:44:44+5:30
दीड तास तणाव
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 19 - शहरातील खान्देश सेंट्रलमधील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये दशक्रिया हा चित्रपटचा शो दाखविण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली तर चित्रपट दाखविण्यास बहुभाषिक ब्राह्मण संघ, परशुराम सेवा समिती, बहुभाषिक ब्राrाण महिला मंडळाने विरोध केला़ दोन्ही गट एकाचवेळी आमनेसामने आल्याने आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये तब्बल दीड तास तणाव निर्माण झाला होता़ अखेर डीवायएसपी सचिन सांगळे यांनी मध्यस्थी करत दोन्ही संघटनांची समजूत घातली़ यानंतर वादावर पडदा पडला़ दरम्यान, या प्रकरणी दोन्ही गटातील 50 जणांवर जमावबंदीचा गुन्हा शहर पोलिसात दाखल झाला आहे. तर तांत्रिक अडचण असल्याने चित्रपट दाखवू शकत नसल्याचे व्यवस्थापकांनी सांगितल्याने चित्रपटाचा शो झाला नाही़
या चित्रपटात समाजाबद्दल आक्षेपार्ह दृष्य असल्याने भावना दुखावल्याने ब्राrाण समाजाने निषेध व्यक्त केला असून चित्रपट दाखविण्यास विरोध केला आह़े शुक्रवारी रिगल सिनेमागृहातीलही शो बंद पाडण्यात आला होता़ त्यानंतर सलग दुस:या दिवशी शहरात वादंग झाला.
दोन्ही गटांचे ठिय्या आंदोलन
ब्राह्मण समाज बांधव व संभाजी ब्रिगेड या दोन्ही गटांनी ठिय्या मांडल्याने चांगलाच गोंधळ झाला़ दोन्ही गटांच्या घोषणाबाजीने खान्देश सेंट्रल दणाणले. दोन्ही गट मागणीसाठी ठाम असल्याने सिनेमागृह प्रशासनासह पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली़ परिस्थिती लक्षात घेता डीवायएसपी सचिन सांगळे यांनी मल्टीप्लेक्स गाठल़े त्यांनी प्रारंभी ब्राम्हण समाजबांधवांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची समजूत घातली़ घोषणाबाजी केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला़ त्यानंतर ब्राम्हण समाजबांधव निघून गेल़े यानंतर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका:यांसह कार्यकत्र्याची समजूत घातली़ व्यवस्थापकाने अडचणीबाबत लेखी द्यावे, अशी मागणी पदाधिका:यांनी केली़ अखेर संभाजी ब्रिगेडतर्फे व्यवस्थापक शहा यांना निवेदन दिले व वादावर पदडा पडला़ जिल्हाधिका-यांना निवेदन देणार असल्याचे संजीव सोनवणे यांनी सांगितल़े यादरम्यान सांगळे यांनी सिनेमागृहात जावूनही पाहणी केली़ या गोंधळामुळ आधी इतर शो ला बसलले प्रेक्षकही घाबरुन बाहेर आले.
शिघ्र कृती दलही दाखल
दोन्ही गटांच्या घोषणाबाजीमुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहर पोलीस ठाणे, जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचा:यांचा बंदोबस्त तैनात होता़ शिघ्र कृती दलालाही पाचारण केले होत़े पोलीस निरिक्षक सुनील गायकवाड, पोलीस निरिक्षक बी़ज़ेरोहम, सहाय्यक पोलीस निरिक्षक आशिष रोही, पोलीस उपनिरिक्षक गिरधर निकम, पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कोसे, गुन्हे शोध पथकातील दुष्यत खैरनार, गणेश शिरसाळे, संजय भालेराव यांच्या कर्मचारी हजर होत़े
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार चित्रपट दाखवा- संभाजी ब्रिगेड
दशक्रिया चित्रपटाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार हा चित्रपट दाखविण्यात यावा, चित्रपट न दाखविणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. सिनेमागृहात चित्रपट सुरु करा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने जोरदार घोषणाबाजी केली़ सिनेमागृहासमोरच ठिय्या मांडला़ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजीव सोनवणे, कार्याध्यक्ष संजय काकडे, खुशाल चव्हाण, सुमित पाटील, समीर पाटील, प्रकाश पाटील ऋषिकेश तुषार उगले, अविनाश बाविस्कर, विजय पाटील, अविनाश पाटील यांच्या मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होत़े
चित्रपट दाखवू नका- ब्राह्मण समाजबांधवांची मागणी
शनिवारी आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये दशक्रिया या चित्रपटाचा शो दाखविला जात असल्याची माहिती ब्राह्मण समाज बांधवांना मिळाली़ महिलांसह 50 ते 60 समाजबांधवांनी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खान्देश सेंट्रल गाठल़े चित्रपट दाखविण्यात येवू नये म्हणून मल्टीप्लेक्सचे व्यवस्थापक वैभव शहा यांची भेट घेतली़ यावेळी समाजबांधवांनी घोषणाबाजी करत ठिय्याही मांडला़ श्रीकांत खटोड, किरण कुळकर्णी, भूपेश कुळकर्णी, निलेश कुळकर्णी, प्रविण कुळकर्णी, भूषण मुळे, रवीवैभव शूर, पियुष रावल, नंदू महाराज शुक्ल, राजाभाऊ जोशी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.