संभाजी राजेंनी एकतर उडी घेवू नये, अन् घेतली तर माघार घेवू नये - बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:38 PM2022-05-28T15:38:42+5:302022-05-28T15:39:59+5:30

Bachchu Kadu : बच्चू कडू शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Sambhaji Raje should either not jump, if he does not take a step back - Bachchu Kadu | संभाजी राजेंनी एकतर उडी घेवू नये, अन् घेतली तर माघार घेवू नये - बच्चू कडू

संभाजी राजेंनी एकतर उडी घेवू नये, अन् घेतली तर माघार घेवू नये - बच्चू कडू

googlenewsNext

जळगाव : एखाद्या निवडणुकीत किंवा इतर राजकीय गोष्टींमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी एकतर उडी घेतलीच नको पाहिजे, आणि जर उडी घेतली असेल तर माघार घेवूच नये’ असा सल्ला राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जळगाव शहरातील एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. संभाजीराजे हे एक तर राजे आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याबाबत आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलणे उचीत नाही. मात्र, आता छत्रपतींनी निवडणुकीत उडी टाकली, आणि माघारदेखील घेतली आहे. त्यामुळे आता त्यांची पुढील भूमिका काय राहिल? हे देखील तेच सांगू शकतात असे ही त्यांनी सांगितले.

बोरा यांनी केले राज्यमंत्र्यांचे पाय धुवून स्वागत
बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नीलेश बोरा यांच्या चौघुले प्लॉट भागातील निवासस्थानी मंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. यावेळी बोरा यांनी बच्चू कडू यांचे पाय धुवून स्वागत केले. त्यानंतर बोरा यांच्या कुंटूंबियांनी बच्चू कडू यांचे औक्षण केले. कार्यकर्त्याने केलेल्या अनोख्या स्वागताने ते भारावले होते. मात्र, अशाप्रकारे पाय धुवून स्वागत करणे हे वेदनादायी आहे. पण, नीलेशने ऐकले नाही, असेही ते म्हणाले.

ईडीचे संकट टाळण्यासाठी राणांना हनुमान चालीसा
राज्यातील इतर मंत्र्यांप्रमाणेच नवनित राणांना ईडीची नोटीस आली होती. मात्र, त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. राणा यांना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यक्रम दिला. तुम्ही जर हनुमान चालीसा म्हटली तर ईडीचे संकट टळेल, असा कार्यक्रम केंद्र शासनाकडूनच राणा यांना देण्यात आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. हा कार्यक्रम झाल्यानंतर ईडी गायब झाल्याचे सांगत बच्चू कडू यांनी भाजप व राणा यांना टोला लगावला.

Web Title: Sambhaji Raje should either not jump, if he does not take a step back - Bachchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.