जळगावात एकाच क्रमांकाच्या दोन कार आढळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:12 PM2017-07-27T12:12:14+5:302017-07-27T12:14:45+5:30

एक जण ताब्यात : पोलिसांकडून माहिती लपविण्याचा प्रय}

same number car trace | जळगावात एकाच क्रमांकाच्या दोन कार आढळल्या

जळगावात एकाच क्रमांकाच्या दोन कार आढळल्या

Next
ठळक मुद्दे एकाच क्रमांकाच्या दोन कार पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर बनावट क्रमांक असलेली कार मुळ क्रमांक असलेल्या मालकानेच पकडून दिली दोन्ही कार पोलीस स्टेशनला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - दोन क्रमांकाचे एक मालवाहू वाहन पकडल्याची घटना ताजी असतानाच दुस:या दिवशी बुधवारी दुपारी एकाच क्रमांकाच्या दोन कार पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर आढळून आल्या. विशेष म्हणजे बनावट क्रमांक असलेली कार मुळ क्रमांक असलेल्या मालकानेच पोलिसांना पकडून दिलेली आहे. यात पोलिसांनी दोन्ही कारसह एका जणाला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांकडून माहिती लपविण्याचा प्रय} होत आहे.
नगर येथून घेतली कार
अहमदनगर येथून फायनान्स कंपनीकडून ही कार घेण्यात आलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे ही कार चोरीची आहे किंवा काय याबाबत  माहिती मिळालेली नव्हती तर पोलिसांकडूनही माहिती लपविण्याचा प्रय} सुरु होता.
मूळ मालकानेच पकडून दिली कार
संदीप राजाराम याज्ञिक (रा.संभाजी नगर, जळगाव) यांच्याकडे एम.एच.19 बी.यु.5535 या क्रमांकाची कार आहे. अशाच क्रमांकाची एक कार जळगाव शहरात असल्याचे त्यांना माहिती मिळाली.  बुधवारी ही कार पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लावलेली असताना याज्ञिक यांनी त्याच कारच्या शेजारी आपली कार लावून जिल्हा पेठ पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी दुस:या कारच्या चालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव वारके सांगितले. या दोन्ही कार पोलीस स्टेशनला आणण्यात आल्या. याज्ञिक यांनी त्यांच्या कारचे मुळ कागदपत्रे सादर केल्याने त्यांची कार सोडण्यात आली तर वारके हा कारचे कागदपत्रे सादर करु शकला नाही. 

Web Title: same number car trace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.