जे पेराल तेच परत मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 09:00 PM2019-01-19T21:00:08+5:302019-01-19T21:01:58+5:30
आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले.
चाळीसगाव, जि.जळगाव : आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले.
येथील ना.बं. वाचनालयात सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी गुंफले. संवेदनशीलता आणि आपण हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रास्ताविक संचालक विश्वास देशपांडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रकाश कुलकर्णी यांनी करून दिला. वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
आपला विषय स्पष्ट करताना प्रा. पाटील यांनी प्राचीन काळापासून तर आजपर्यंतच्या अनेक गोष्टींचे दाखले दिले. आयुष्यभर घाणीत राहणाऱ्या माणसाला अत्तराचा सुगंधी वासदेखील नकोसा वाटतो. संवेदनशीलता आणि आपले असेच नाते आहे. आज जग क्रेता आणि विक्रेता अशा दोन भागात विभागले गेले आहे. प्रत्येकजण जग ही जणू काही बाजारपेठ असल्यासारखे वागतो. पण मानवी जीवनातील नाती, नात्यातील प्रेम, विश्वास या गोष्टी विकत घेता येत नाहीत. आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वार्थापोटी तो नाती जपतो. रामायणात गूह आणि शबरी हे दोन समाजातील खालच्या वर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना रामाने उराशी धरले. कुंतीने कृष्णाकडे मला सदैव विपरीत परिस्थितीत ठेव असे वरदान मागितले. कारण आपल्यावर संकटे आली किंवा विपरीतआली तर आपल्याला देवाची आठवण येते. आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथार्पोटी तो नाते जपतो. रामायणात गूह आणि शबरी हे दोन समाजातील खालच्या वगार्चे प्रतिनिधी आहेत. त्यांना रामाने उराशी धरले. कुंतीने कृष्णाकडे मला सदैव विपरीत परिस्थितीत ठेव असे वरदान मागितले. कारण आपल्यावर संकटे आली किंवा विपरीत परिस्थिती आली तरच आपल्याला देवाची आठवण येते.
आभार वाचनालयाचे संचालक राजेश ठोंबरे यांनी मानले. व्याख्यानमालेचे प्रायोजक भोजराज पुन्शी आणि सदरच्या व्याख्यानाचे प्रायोजक डॉ.सुभाष निकुंभ यांचेही त्यांनी आभार मानले. व्याख्यानमालेचे प्रमुख मनीष शहा व अन्य संचालक यावेळी उपस्थित होते.