कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात सहा ठिकाणी घेतले दुधाचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:57 AM2018-10-24T11:57:57+5:302018-10-24T11:58:08+5:30

नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले

Samples of milk from six places in Jalgaon district on the backdrop of Kojagari full moon | कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात सहा ठिकाणी घेतले दुधाचे नमुने

कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात सहा ठिकाणी घेतले दुधाचे नमुने

Next

जळगाव : कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जळगाव शहर व एरंडोल येथे एकूण सहा ठिकाणांहून दुधाचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.
कोजागरी पौर्णिमेला दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे त्यात भेसळ होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सोमवारपासून दुधाचे नमुने घेण्यात आले. यामध्ये सोमवार व मंगळवारी जळगाव शहरात चार ठिकाणांहून तर एरंडोल येथून दोन ठिकाणांहून दुधाचे नमुने घेतले गेले. या नमुन्यांची तपासणी करून काही भेसळ आढळल्यास कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. त्यासाठी हे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक विवेक पाटील, अनिल गुजर, सुवर्णा महाजन यांनी ही कार्यवाही केली.

Web Title: Samples of milk from six places in Jalgaon district on the backdrop of Kojagari full moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.