सिरो सर्व्हेत घेतलेले नमुने चेन्नईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:43 PM2020-08-27T12:43:32+5:302020-08-27T12:44:02+5:30
जळगाव : जिल्ह्यात आयसीएमआरच्या पथकाकडून मंगळवारी करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेमध्ये घेण्यात आलेले रक्तनमुने चेन्नई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...
जळगाव : जिल्ह्यात आयसीएमआरच्या पथकाकडून मंगळवारी करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेमध्ये घेण्यात आलेले रक्तनमुने चेन्नई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल तपासणीनंतर येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
शहरातील कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण, त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत किती नागरिकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अॅण्टीबॉडी तयार झाल्या आहेत़, याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात आयसीएमआरचे अधिकारी आदित्य बेंगळे व पथकाकडून मंगळवारी सिरो सर्व्हे करण्यात आला. यामध्ये घेतलेले रक्तनमुने चेन्नई येथे पाठविण्यात आले आहेत. तेथे तपासणी होऊन त्याचा अहवाल येणार असल्याचे सांगण्यात आले. जळगावातील तपासणीनंतर हे पथक परभणीकडे रवाना झाले.