समृद्धी केमिकल्सच्या मालकांची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:32+5:302021-05-19T04:16:32+5:30
जळगाव : समृद्धी केमिकल्समधील दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या सुबोध सुधाकर चौधरी, सुनील सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी या ...
जळगाव : समृद्धी केमिकल्समधील दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या सुबोध सुधाकर चौधरी, सुनील सुधाकर चौधरी व सुयोग सुधाकर चौधरी या तिघांची न्यायालयाने मंगळवारी कारागृहात रवानगी केली.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा विभागाचे निरीक्षक कन्हैया झोपे यांनी कंपनीत जाऊन भेट दिली, मात्र कंपनी बंद असल्याने चौकशी करता आली नाही. २०२१ या वर्षासाठीच्या कंपनीच्या परवान्याची मुदत अजून आहे. इतर चौकशी मालक आल्यावरच होईल, असे झोपे यांनी ‘लोकमत’ सांगितले.
या कंपनीत नेमके कशाचे उत्पादन होत होते, कच्चा माल काय आहे, कोणत्या केमिकलचा वापर होतो याची अद्याप चौकशी बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
या गुन्ह्यात हिरा सुबोध चौधरी व अपर्णा सुयोग चौधरी (रा. सागर नगर, एमआयडीसी) यांना अद्याप अटक झालेली नाही. सुबोध चौधरी, सुनील चौधरी व सुयोग चौधरी या तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.